♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगांव बाजार समितीत चालु वर्षी उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक – बाळासाहेब क्षिरसागर.

लासलगांव बाजार समितीत चालु वर्षी उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक – बाळासाहेब क्षिरसागर.

सौ रत्ना उपाध्ये लासलगाव प्रतिनिधी

लासलगांव, दि. 05 लालगावातील येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवार दि. 03 जुलै, 2023 रोजी 2,035 वाहनांमधुन सर्वाधिक 37,550 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी रू. 700/-, जास्तीत जास्त रू. 2,651/- व सर्वसाधारण रू. 1,460/- प्रती क्विंटल होते.

सोमवार दि. 03 जुलै, 2023 रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी येथील बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार सकाळपासुन वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले होते. आज दिवसभरात येथील बाजार आवारावर 460 ट्रॅक्टर व 1,575 पिकअप मधुन 37,550 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. त्यामुळे चालु वर्षात कांद्याची विक्रमी आवक झाली. रविवारी साप्ताहीक सुट्टीमुळे कांदा लिलाव बंद असल्याने येथील बाजार समितीत कांदा विक्री करणेसाठी शेतकरी बांधवांनी एकच गर्दी केली होती. बाजार आवारावर आलेल्या सर्व आवकेचे लिलाव पुर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व बाजार समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पुर्ण केल्याने आज विक्रमी कांदा आवकेचा लिलाव वेळेत पुर्ण करण्यात त्यांना यश आले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

सध्या खरीप पिकाच्या लागवडीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असल्याने शेतकरी बांधवांना मशागतीचे कामे, बि-बियाणे, रासायनिक खते, औषधे इ. कामांसाठी पैशांची निकड भासत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असुन आलेल्या सर्व आवकेचे त्याच दिवशी लिलाव पुर्ण करून शेतकरी बांधवांना रोख चुकवती केली जात आहे. सोमवार दि. 03 जुलै, 2023 रोजी बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांमिळुन सुमारे 10 कोटी रूपयांची उलाढाल झाली. बाजार आवारावर विक्रीस आलेल्या शेतीमालाचे वेळेत लिलाव व वजनमाप होत असल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असुन बाजार आवारावर आलेल्या सर्व आवकेचे वेळेत लिलाव व वजनमाप पुर्ण केल्याबद्दल बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह सदस्य मंडळाने सर्व अडते, व्यापारी, हमाल, मापारी, कांदा भरणार हमाल, मदतनीस व बाजार समिती सेवकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

 

निफाड व विंचुरलाही कांद्याची विक्रमी आवक

लासलगांव पाठोपाठ बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारावरही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. निफाड उपबाजार आवारावर 686 वाहनांमधुन 6,600 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. बाजारभाव कमीत कमी रू. 500/-, जास्तीत जास्त रू. 1,700/- व सर्वसाधारण रू. 1,350/- प्रती क्विंटल होते. तसेच विंचुर उपबाजार आवारावरही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. आज विंचुर उपबाजार आवारावर 1561 वाहनांमधुन 28,500 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. बाजारभाव कमीत कमी रू. 600/-, जास्तीत जास्त रू. 1,901/- व सर्वसाधारण रू. 1,401/- प्रती क्विंटल होते. आलेल्या सर्व आवकेचे सायंकाळपर्यंत लिलाव पुर्ण करण्यात आल्याने तेथील व्यापारी वर्गासह इतर सर्व मार्केट घटकांचे तसेच मालविक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांचे बाजार समिती प्रशासनाने आभार व्यक्त केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles