♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगांव बाजार समितीत सोमवार पासुन डाळींब लिलावास सुरूवात – बाळासाहेब क्षिरसागर.  

जनहित न्यूज24 प्रतिनिधी रत्ना उपाध्ये

 

लासलगांव, येथील बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर सोमवार, दि. 10 जुलै, 2023 पासुन डाळींब लिलावास सुरूवात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

         लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा ह्या तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीतर्फे गेल्या 08 ते 09 वर्षापासुन डाळींब लिलावास सुरूवात करण्यात आली आहे.

त्यानुसार ह्यावर्षी सोमवार, दि. 10 जुलै, 2023 पासुन प. पू. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार, लासलगांव येथे डाळींब लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे डाळींब उत्पादकांनी आपला डाळींब हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून 20 किलोच्या क्रेटस् मध्ये विक्रीस आणल्यास त्यास जास्तीत जास्त बाजारभाव मिळणार आहे.

किडका, पिचका, लहान (अपरीपक्व), खर्डा असलेला डाळींब वेगळ्या क्रेटस् मध्ये विक्रीस आणावा. लिलावानंतर इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप व त्यानंतर लगेचच रोख चुकवती देण्यात येणार आहे. तसेच डाळींब खरेदीस इच्छुक असणा-या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे क्षिरसागर यांनी सांगितले.

तरी शेतकरी बांधवांनी त्यांचा डाळींब हा शेतीमाल सोमवार, दि. 10 जुलै, 2023 पासुन प. पू. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार लासलगांव येथे विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह सर्व सदस्य मंडळाने केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles