♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल व “हरित सेना” यांच्या तर्फे “झाडे लावा,झाडे जगवा”, हा कार्यक्रम आयोजित

जनहित न्यूज24

प्रतिनिधी रत्ना उपाध्ये

 आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणीय जीवन पद्धतीचा अवलंब केला, तर पृथ्वीचे संरक्षण केले जाऊ शकते हे लक्षात घेऊन आज दि. ०८/०७/२०२३ रोजी संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल व “हरित सेना” यांच्या तर्फे “झाडे लावा,झाडे जगवा”, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमासाठी शाळेच्या संचालिका मनिषा होळकर , नंदा डमरे , रश्मी दगडे शाळेच्या मुख्याध्यापिका आश्विनी कुशारे, तसेच हरित सेनेचे कार्यकर्ते संजय बिरार, नीलेश वर्मा, ऋषिकेश जोशी, डॉक्टर रुपेश गांगुर्डे, शेखर शिंदे, मनोहर जाधव, राजुबाबा होळकर, महिला मंडळातर्फे पुष्पाताई दरेकर, कविता बिरार, वैशाली भावसार, भारती सोनवणे, रोहिणी जाधव, शैलेजा भावसार, फरीदा काजी, उषा कुमावत, अर्चना डुंबरे, यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्याचप्रमाणे झाडांचे महत्व पटवून देण्यासाठी शाळांमध्ये वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड केली व झाडे लावा झाडे जगवा अश्या घोषणाही देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली नाईक आणि रोहिणी बोरसे यांनी केले. शाळेच्या शिक्षिका मनीषा अभंग यांनी “हिरवा निसर्ग ” ह्या गाण्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या उप- प्राचार्या मंगला कदम , सह शिक्षिका सारिका पाटील, , सुरेखा भावसार, शबाना काद्री, योगिता पाटील, असिम सर, गीता ठोंबरे, शिरीन शेख, अनुश्री कदम , प्रमिला रायते, नम्रता गरड , सविता दरेकर, किशन बत्तीसे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles