♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगांव बाजार समितीत डाळींब लिलावास प्रारंभ – बाळासाहेब क्षिरसागर.  

जनहित न्यूज:रत्ना उपाध्ये

 

लासलगांव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर डाळींब लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

          नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, व सिन्नरसह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तसेच  संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड, वैजापुर व कन्नड आदी तालुक्यांतील गावांमध्ये शेतकरी बांधवांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीतर्फे गेल्या 08 ते 09 वर्षापासुन डाळींब लिलावास सुरूवात करण्यात आली आहे. डाळींब उत्पादकांनी आपला डाळींब शेतमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळींब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे क्षिरसागर यांनी शुभारंभ प्रसंगी सांगितले.

            तसेच डाळींब खरेदीस इच्छुक असणा-या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपसभापती गणेश डोमाडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

            सुरूवातीस अरूण माणिक आव्हाड, रा. आंबेगांव ह्या शेतक-याच्या डाळींब शेतीमाल क्रेटसचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यात आले. दिवसभरात 299 क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 200/- जास्तीत जास्त रू. 5,100/- सरासरी रू. 2,011/- याप्रमाणे होते.

याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे, जयदत्त होळकर, संदीप दरेकर, छबुराव जाधव, सौ. सोनिया होळकर, श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, रमेश पालवे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, लेखापाल सुशिल वाढवणे, पंकज होळकर, हिरालाल सोनारे, संदीप निकम, प्रभारी भास्कर उगलमुगले, संजय होळकर, सचिन वाघ, सचिन बैरागी, शुभम उपाध्ये, प्रमोद जाधव, डाळींब व्यापारी अखलाख अन्सारी, गफार नाईकवाडी, सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक, जिब्राईल नाईकवाडी, तौसीफ बागवान, तबरेज शेख, राजु सैय्यद, कौसीक बागवान यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles