♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगांव येथे मनसेचा ‘एक सही संतापाची’ उपक्रम..

जनहित न्यूज:रत्ना उपाध्ये

लासलगांव येथे विंचुर रोड वरील सुरक्षा हॉस्पीटल शेजारील निरंजन ट्रान्सपोर्टचे कार्यालयासमोर एक सही संतापाची या उपक्रम राबवुन सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

सद्या शेतकरी, विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील जनतेला सुरळीत घरी ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होवुनही त्यांना भरपाई मिळालेली नाही.


विद्यार्थ्य़ांना शैक्षणिक कामासाठी लागणारे महसुली दाखले महिना-महिना मिळत नाही. यांसारख्या असंख्य प्रश्न सद्या शेतकरी व जनतेपुढे आहे. याची जाणीव सरकारला असूनही त्यांची कामे करण्यात सरकारला कोणतेही स्वारस्थ दिसुन येत नाही.

त्याऐवजी राजकारणाचा या राज्यकर्त्यांकडुन चिखल करण्यात आला आहे. त्या पार्शवभुमीवर आज (दि.११) सकाळी लासलगांव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सुरक्षा हॉस्पिटल जवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडक रोडवरील उमा हॉटेलजवळ शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लासलगांव पंचक्रोशीतील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यातील राजकारणाचा करण्यात आलेला चिखलाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत, ‘एक सही संतापाची’ आपला संताप व्यक्त करत मनसे बोर्डवर आपल्या स्वाक्षऱ्या नोंदविल्या.

यावेळी मनसे च्या महीला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष रतन कुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष अनंता सांगळे, उपजिल्हा उपाध्यक्ष बालेश जाधव, निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे, महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेचे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, निफाड तालुका संघटक अब्दुल शेख, माजी तालुकाध्यक्ष शैलेश शेलार, जिल्हाध्यक्ष सहकार सेना प्रकाश गोसावी, निफाड तालुकाध्यक्ष सहकार सेना भोला ससकर, लासलगाव मनसे शहराध्यक्ष अमित गंभीरे, माजी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सुरज पवार, रामदास गांगुर्डे, वाळू साप्ते, नवनाथ गांगुर्डे, भगवान जिरे, कैलास शिरसाट, स्वप्नील सुपेकर, अभिजीत सोनवणे, नितीन ढोकळे, शुभम कद्रे, धनंजय गायकवाड, शुभम चौधरी, सुमित गिते, अजय जाधव आदीसह मनसे सैनिक व शेतकरी, तरुण-तरुणी उपस्थित होते.

”महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष आणि राजकारणातील झालेला चिखल बघता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पर्याय उरलेला आहे. त्यामुळे साहेबांचे विचार संपूर्ण निफाड तालुक्यातील तमाम नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक सही संतापाची असा उपक्रम राबविण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles