♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर शाळेस व्हाईट बोर्ड भेट .

जनहित न्यूज लासलगाव प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर या शाळेची शैक्षणिक गरज विचारात घेऊन संस्थेचे सभासद व वेळापूर गावचे भूमिपुत्र नोकरीनिमत्ताने पुणे शहरात असलेले ज्ञानेश्वर शिंदे यांच्या विशेष सहकार्याने व्हाईट बोर्ड भेट देण्यात आला.

संस्थेने २०१६ पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले असून शाहिद जवान कुटुंब, समाजातील गरीब, दिव्यांग,गरजू व्यक्ती, दिपावली फराळ वाटप,शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य, कोरोना आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीचे कुटुंब, अनाथ मुले, निराधार महिला यांना मदत करण्यात आली. संस्थेचे ब्रीदवाक्य “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे असून मानवाला दुःखातून सावरण्यासाठी त्याला आधार देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले.

जाते.आजपर्यंत संस्थेच्या वतीने १७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.सुनिल देवढे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे सरपंच नारायण (तात्या) पालवे यांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कुटे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) हे उपस्थित होते.
प्रा.अरुण देवढे सर यांनी शाळेतील विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना प्राथमिक शिक्षण व जीवनातील गुरू यांचे महत्त्व यावर बहूमोल मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष केशवराव जाधव, सचिव प्रा.सुनिल देवढे सर, विश्वस्त प्रा.अरुण देवढे सर, तसेच, निफाड वकील संघाचे खजिनदार Ad केशवराव शिंदे , नारायण कुटे, भिमराज शिंदे ,संजय (काका) शिंदे , जालिंदर भागवत, ज्ञानेश्र्वर कुटे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष गणेश ठाकरे ,गणेश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी अनंत सोमवंशी (अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे(पुणे), उपाध्यक्ष योगेश न्याहरकर,कार्याध्यक्ष ऍड.सुनिल वाघचौरे,खजिनदार सुर्यकांत जाधव,विश्वस्त समीर देवढे सर, डॉ.शशिकांत देवढे, सोपान जाधव, ज्ञानेश्वर देवढे, सुरेखा देवढे, सभासद गोरख देवढे सर,प्रताप आढाव सर,सचिन शेलार सर, नवनाथ कोकणे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शेलार सर यांनी तर आभार गणेश ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles