♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव मंडल तर्फे भाजपा नाशिक उत्तर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माननीय श्री शंकररावजी वाघ यांचा सत्कार..

जनहित न्यूज24

लासलगाव प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

शंकरराव वाघ यांनी आज लासलगाव मंडलाचा दौरा करताना सत्काराला उत्तर देताना आपला पक्षातला प्रवास ,पक्षातले संघटनाचे महत्व आणि बूथ सशक्तिकरण यांचे महत्व सांगितले.

नाशिक मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन श्री प्रकाश शेठजी दायमा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 35 वर्षापेक्षा जास्त पक्षाची एकनिष्ठ सेवा करत जिल्हा सरचिटणीस पदी 15 वर्ष काम करत माननीय शंकर रावजी वाघ यांनी उत्तमरीत्या काम करत संघटने चे काम वाढवले.त्यांची कामाची तळमळ पाहून पक्षाने त्यांना चांगला न्याय दिला आणि सघटनात्मक मोठी जबाबदारी दिली, असे कौतुकाचे उद्गार यावेळेस प्रकाश दायमा यांनी काढले.

लासलगाव भाजप मंडल चे अध्यक्ष डी के नाना जगताप यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि शंकररराव वाघ हे कशाप्रकारे तळागाळातील लोकांना कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर घेऊन काम करतात तसेच प्रत्येकाबरोबर न्यायपूर्वक वागले आहेत.असे मनमिळावू नेतृत्व आपल्या भागाला लाभल्यामुळे व संघटन वाढीसाठी सर्व लासलगाव मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहू असे उदगार डी के नाना जगताप यांनी या वेळेस काढले.

महिला मोर्चा नाशिक ग्रामीण च्या वतीने महिला मोर्चा ग्रामीणचे अध्यक्ष सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप आणि मंडलाध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनीही आपले मनोगत यावेळेस व्यक्त केले.

सर्व पदाधिकारी यांनी शंकरराव वाघ यांच्या पाठीशी एकजूट राहुन लासलगाव मंडलाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी लासलगाव मंडल अध्यक्ष डी के नाना जगताप, नाशिक मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश शेठजी दायमा, राजाभाऊ चाफेकर, भाजपा महिला मोर्चा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा जगताप, महिला मंडल अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, मंडल उपाध्यक्षा रुपा केदारे,भारती महाले, शहराध्यक्ष शैलजा भावसार, योगिता आंबेकर, सोनाली शिंदे , मंडल सरचिटणीस निलेश सालकाडे, सरचिटणीस नितीन शर्मा, युवा अध्यक्ष निलेश जगताप ,बापू लचके , ज्ञानेश्वर गांगुर्डे ,सुनील नेवगे ,अभिजीत घोटेकर धनंजय गांगुर्डे, जैन प्रकोष्ठ चे जिल्हा उपाध्यक्ष मनीष चोपडा, शीतल ताथेड, प्रीतेश अब्बड, वरून दगडे,अमोल बागमार, कोटमगाव चे सरपंच श्री तुकाराम गांगुर्डे,अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष लक्ष्मण खलसे, सुरेश पाथरे, राजू शेलार, इसाक रंगरेज, केशव पाथरे, टाकळी ग्रामपंचायत सदस्य श्री केशव जाधव, कैलास जैन, खिलवाणी मामा ,सुनील सांगळे. सादिक मुलानी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles