♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश

जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

लासलगाव – लासलगाव रेल्वे स्टेशन येथे भुसावळ विभागाचे डिआरएम इती पांडेय यांनी दौरा करून रेल्वे स्टेशन ची पाहणी केली.

रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी रेल्वे बोर्डाने अमृत भारत स्टेशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकरण होणार आहे.त्याचे उद्घाटन १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत.

लासलगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश झाल्याने येत्या काही दिवसात या रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या सोयी – सुविधा निर्मिती करण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.
वर्षभरात लासलगाव रेल्वे स्थानकाचे रूप पूर्णतः बदलणार आहे. यामुळे शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार आहे.
या मध्ये नविन बुकिंग ऑफिस,स्थानक परिसराचे सुशोभीकरण, न्यू फूट ओव्हर ब्रीज लिफ्ट सह,प्लॅटफॉर्म कोच इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक बोर्ड डिस्प्ले,स्थानक प्रवेशद्वारांचा विकास,व्हीआयपी प्रतीक्षागृहांची उभारणी
अंतर्गत रचनेत सुधारणा, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा
कांदा लोडिंग काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लासलगाव स्थानकाचा यात समावेश करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा लासलगाव मंडल अध्यक्ष डी. के. जगताप, सुवर्णा जगताप यांनी वेळोवेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डिआरएम इती पांडेय यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
लासलगाव येथे रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डिआरएम इती पांडेय यांचा सत्कार डि.के जगताप व सुवर्णा जगताप यांनी केले यानंतर यांना निवेदन देण्यात आले
सेंट्रल रेल्वे भुसावळ च्या डिविजनल रेल्वे मॅनेजर श्रीमती ईती पांडेय यांचे लासलगाव रेल्वे स्टेशन येथे बाजार समितीच्या मा सभापती व संचालिका सुवर्णा जगताप तसेच भाजप पदाधिकारी,प्रवासीसंघटना,प्रवासी,नागरिकयांच्या तर्फे स्वागत करण्यात आले…

यावेळी कोरोना काळात रद्द झालेल्या देवगिरी एक्सप्रेस,जनता एक्सप्रेस,शालीमार या गाड्या चालू कराव्या,पठाणकोट अमृतसर एक्सप्रेस ला थांबा मिळावा ,कुर्ला एक्सप्रेस मनमाड पासून पूर्ववत चालू करावी आणि कांदा लोडिंग साठी काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात मागण्या करण्यात आल्या.प्रवासी संघटनेतर्फे ही निवेदन देण्यात आले..यावेळी प्रकाशसेठ दायमा,डी के नाना जगताप,सुवर्णा जगताप,राजाभाऊ चाफेकर,नितीन शर्मा,निलेश सालकाडे,गणेश डोमाडे,बापू लचके,बबन शिंदे,सरपंच शितल शिंदे,सुनील नेवगे,ज्ञानेश्वर शिंदे,सुनील शिंदे,मनोहर खिलवाणी,भाऊसाहेब वाघ,गोपीनाथ उगले,भगवान बोराडे,राजू शेख,शैलजा भावसार,भारती महाले,योगिता आंबेकर,सोनाली शिंदे,ऐश्वर्या जगताप उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles