♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात.. तरुण शेतकरी बचावला.. पिंपळगाव नजिक ते वाहेगाव साळ रस्ता बनला मृत्युंचा सापळा…

जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द येथील तरुण शेतकरी समाधान विनायक जाधव (वय-२७) हा सकाळी साधारणतः ७ वाजेच्या सुमारास लासलगाव येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात होता. पिंपळगाव नजिक माईंबा बाबा रोडवरील सरोदे सरांच्या वस्तीजवळपास अपघात होऊन कांदा आणि ट्रॅक्टर ट्रेलरचे मोठे नुकसान झालेले आहे.

सुदैवाने समाधान हा या अपघातातून बचावला आहे. परंतु ट्रॅक्टर आणि कांद्याचे  लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरचा अपघात हा केवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झाला आहे असे घटनास्थळी असणााऱ्या रहिवाशी आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती.

पिंपळगाव नजिक ते वाहेगाव साळ या रोडला मागील २५-३० वर्षांपासून डांबरच माहिती नाही. या रस्त्याची मागील २५-३० वर्षांपासून दुरुस्ती किंवा डागडुजी झालेली नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवण्यात आल्याची चर्चा परिसरात होतांना दिसून आली.

या रस्त्यावर उघडी पडलेली खडी, दगड यातूनच परिसरातील शेतकरी बांधव, विद्यार्थी मार्गक्रमन करतांना दिसून येत आहेत. रस्त्याचा दुरावस्थेमुळे या रस्त्याने दोन चाकी वाहन चालवीनेच नव्हे तर पायी चालणे देखील मोठे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे या परिसरातून शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करत असतात.

“हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा परिसरातील राजकीय पुढऱ्यांना कधीच दिसला नाही का..? असा संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. एकीकडे भारत देश प्रगती करत जगावर अधिराज्य गाजवीत आहे. तसेच चंद्रावर पाणी आहे की नाही शोधण्यासाठी जात आहे. त्यापेक्षा येथील शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार पेठांपर्यंत सुस्थितीत कसा नेता येईल..? ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटेल.? याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेची पहाणी करून सदरचे रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

आज पहाटे समाधान जाधव कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जात असतांना मागून येणाऱ्या दुचाकी वाहणाला वाट करून देत असतांना रात्यातील खड्याच्या खटकीतून ट्रॅक्टर उलटत असल्याचे समाधानच्या लक्ष्यात येताच त्याने समयसूचकतेने उडी घेऊन आपला जीव कसाबसा वाचवीला. ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पल्टी झाला. समाधानला किरकोळ जखमा झाल्या, परंतु ट्रॅक्टर ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आहे. आजचा अपघात रस्त्यावरील खाच खळगे आणि खड्यांमुळे झालेला आहे. याआधी देखील या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहे. सदरच्या रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे.

“रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आज माझ्या ट्रॅक्टर आणि ट्रेलर चे मोठे नुकसान झालेले आहे. तसेच कांदा नाल्यात पडून त्याची प्रतवारी घसरणार आहे. अपेक्षित बाजार भाव मिळणार नाही. त्यामुळे माझे लाखोंचे नुकसान झालेले आहे. तरी मला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मदत मिळणे गरजेचे आहे. खरीप हंगामासाठी झालेला खर्च आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेले नुकसान हे सहन न करण्यासारखे आहे. त्यामुळे मला संबंधितांनी मदत करणे अपेक्षित आहे. समाधान जाधव, अपघात ग्रस्त तरुण शेतकरी.. “

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles