♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चुकीची शस्त्रक्रिया केल्याने अपंगत्व आलेल्या युवकाचे खाजगी डाॅक्टर विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

जनहित न्यूज24 नासिक प्रतिनिधी:रोशन गव्हाणे

 

नाशिक : शहरातील नामवंत हाॅस्पिटल असलेल्या वेदांत रुग्णालयातील डाॅ. राजेंद्र नेहते यांनी चुकीची शस्त्रक्रिया केल्याने अपंगत्व आल्याचा आरोप करत संबंधित डाॅक्टरावर कठोर कारवाई करावी या साठी सिन्नर तालुक्यातील प्रकाश काकड या दिव्यांगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

मा. राज्यमंत्री बच्चु कडु यांनी दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपोषणार्थी दिव्यांग प्रकाश काकड यांची भेट घेतली.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी सदर उपोषण प्रहार दिव्यांग संघटनेचा पाठिंबा असुन काकड यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, सदर युवक ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील असल्याने संबंधित रुग्णालय त्यांना दाद देत नसल्याचा आरोप कार्याध्यक्ष बबलु मिर्झा यांनी केला, या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, शहराध्यक्ष सुभाष निकाळजे, शालिग्राम उबाळे आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles