♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ते थेटाळे मार्गे वनसगाव बस सेवा अखेर सुरू डी के नाना जगताप व सुवर्णा जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या लासलगाव ते थेटाळे मार्गे वनसगाव बस सेवा रेल्वे गेट नंबर १०३ चे पूर्ण झाल्यानंतरही लासलगाव बस आगरातर्फे आठ महिने बंद होती.

थेटाळे ते वनसगाव बस सेवा पूर्ववत चालू व्हावी यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून श्री डी के नाना जगताप व सुवर्णा जगताप यांनी सतत पाठपुरावा केला. वणसगाव येथील शाळेत जाणाऱ्या जवळपास १५० विद्यार्थ्यांना बस सेवा खंडित असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता.परंतु आता बस सेवा परत सुरु होत असल्यामुळे विद्यार्थी व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व जगताप दांपत्याचे आभार मानले.

रेल्वे गेट नंबर 103 खालून बसला टर्न बसत नसल्याचे कारण देऊन लासलगाव बस डेपो ने आठ महिन्यांपूर्वी लासलगाव ते वनसगाव थेटाळे मार्गे जाणारी बस अचानक बंद केल्यामुळे शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. लासलगाव बस डेपो च्या मॅनेजर काळे मॅडम, नाशिक येथील सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री पानसरे साहेब, रेल्वेचे सेक्शन इंजिनियर श्री संतोष हेडाव यांच्यासमोर आज बसची ट्रायल घेण्यात आली. रेल्वे पुलाखालून बस व्यवस्थित ये-जा करू शकते असा दाखला यावेळी देण्यात आला आणि बस सेवा चालू करण्याचा मार्ग मोकळा झाला.यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप, लासलगाव मंडल उपाध्यक्षा रूपा केदारे, थेटाळे गावच्या सरपंच शितल शिंदे, सदस्य सोनाली शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चव्हाण सर, केदारे सर, ज्ञानेश्वर कुशारे, सुनील शिंदे,बाबाजी शिंदे, अमोल माळी,अरुण माळी ,उत्तम माळी ,गणेश माळी ,नितीन शिंदे, रतन शिंदे, अनिल शिंदे थेटाळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles