♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व समाज सुधारक लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

लासलगाव :

नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार सर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व सहकारी शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. व नंतर पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार सर यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित मनोगत व्यक्त केले.

” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” या टिळकांच्या वाक्याची त्यांनी गर्जना केली. तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. विद्यार्थ्यांनी इथून पुढे भविष्याचा वेध कसा घ्यावा या क्रांतिकारकांनी व समाज सुधारकांनी देशाला व राज्याला जी देणगी दिली आहे जे विचार दिलेले आहेत ते विचार आपण आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे हे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य़ टिळक या दोन्ही महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे सांगुन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे असे सांगीतले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी श्री देवेंद्र भांडे, श्री सुनिल गायकर आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles