♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगांव बाजार समितीत टोमॅटो लिलावास सुरूवात  – बाळासाहेब क्षिरसागर.

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

लासलगांव, दि १ येथील बाजार समितीच्या प. पू. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवारावर चालु हंगामातील टोमॅटो लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. 

प्रारंभी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, रमेश पालवे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, टोमॅटो व्यापारी बापु धरम, गणेश देशमुख यांच्या हस्ते टोमॅटो क्रेटस् चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर गोंदेगांव, ता. निफाड येथील शेतकरी जालींदर तुकाराम खामकर यांचा टोमॅटो हा शेतीमाल रू. 5,100/- प्रती क्रेटस् ह्या दराने दोस्ती ट्रेडींग कंपनी यांनी खरेदी केला.

सदर लिलाव शुभारंभ प्रसंगी क्षिरसागर यांनी आपल्या मनोगतात लासलगांव बाजारपेठ कांद्याबरोबर, मका, सोयाबीन, टोमॅटो, डाळींब व भाजीपाल्यासाठीही नावारूपास येत आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावे म्हणुन टोमॅटो खरेदीदार / निर्यातदार व्यापा-यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार असुन लिलावानंतर शेतक-यांना तांतडीने रोख चुकवती केली जाणार आहे.

तसेच टोमॅटो लिलावात नव्याने सहभागी होऊ इच्छीणा-या खरेदीदार / निर्यातदार व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपसभापती गणेश डोमाडे यांनी सांगितले

याप्रसंगी टोमॅटो व्यापारी मच्छींद्र काळे, हैदर पठाण, सागर आहेर, संजय साळुंके, सचिन देशमुख, नंदु जाधव, आसिफ पठाण, सुधीर मोरे, शरद हिरे, दिपक केदारे, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, पंकज होळकर, संतोष पोटे, हिरालाल सोनारे, स्वप्निल पवार, प्रभारी संजय होळकर, सचिन वाघ, संदीप शेलार, बलराम माठा यांच्यासह टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लिलावाचे दिवशी दिवसभरात एकुण 234 क्रेटस् मधुन टोमॅटो हा शेतीमाल विक्रीस आला. कमीत कमी रू. 1,000/-, जास्तीत जास्त रू. 5,100/- व सरासरी रू. 2,600/- प्रती क्रेटस् भाव मिळाला. टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतीमाल मोठा (सुपर / एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून 20 किलोच्या कॅरेट मध्ये विक्रीस आणावा असे आवाहन सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles