♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या नवीन पाईप लाईनचे काम १० ऑगस्ट पर्यंत होणार पूर्ण छगन भुजबळ

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार दिलीप खैरे यांनी केली अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी

 

 

लासलगाव:- मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार लासलगाव विंचूर सह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू असून दि.१० ऑगस्ट पर्यंत नवीन पाईप लाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप अण्णा खैरे यांनी विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

यावेळी पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता श्री.निकम, छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत, स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, अनिल विंचूरकर, ओम राऊत यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles