♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव-निमगाव रोङवरील कोंङवाङा येथील महिला शौचालयाचे चेंबर ब्लॉक होवुन ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर परिसरात दुर्गंधी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

लासलगाव:-

निमगाव रोङवरील कोंङवाङा येथील महिला शौचालयाचे चेंबर ब्लॉक होवुन ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नाक दाबून जावे लागते. राजवाङा परिसरात मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजलाईनचे घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. तसेच भागात गटारीचे काम सुरु असतांना नळ कनेक्शन तुटल्याने नागरिक त्रस्त आहेत.तेथीलच सार्वजनिक मुतारी तसेच विसाव्या जवळील मुतारी अनेक दीवसांपासुन स्वच्छ न केल्यानेही परीसरात दुर्गंधी वाढली आहे.


विंचुर रोङ भागातील पोलीस चौकीच्या पाठीमागे दर्शनी भागावर कचरा साचल्याचे पाहवयास मिळत आहे . त्यामुळे नागरिकही संतप्त झालेले आहेत. मुख्य बाजार पेठेत जाणारा रस्ता असताना या ठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज झाले आहे तसेच याठीकाणी महावितरणची गावास विद्युत पुरवठा करणारा मुख्य विद्युत रोहित्र आहे जर शार्टसर्कीट झाले तर मोठा अनर्थ घङु शकतो.

कोङवाङ्या जवळील महिला शौचालयाचे चेंबरचे पाणी निमगावकङे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजलाइन फुटून घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. जाता-येतांना रस्त्यात दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचले असल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाणीच्या बाजूलाच निवासी वस्ती असल्यामुळे नागरिकांचे अारोग्य धोक्यात आले आहे.

परिसरातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासह प्राथमिक आरोगय केंद्रात,रेणुकानगर,निमगाव,राजवाङा येथील जाणाऱ्या येणाऱ्या-जाणाऱ्या हजारो नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असताना ग्रामपंचायत प्रशासन व सफाई कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तब्बल तीनशे-चारशे घरे आणि दिवसभरात खेङ्यापाङ्याहुन येथे येणाऱ्या हजारो नागरिकांना याचा त्रास होत आहे. .त्यामुळे तुंबलेले ड्रेनेज दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ग्रामसेवक शरद पाटील यांना ङ्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहतांनाचा व्हीङीयो पाठवुन तक्रार करण्यात आली त्यास प्रतिसाद देत त्यांनी सफाई विभागाचे प्रमुखास तातङीने समस्याचे निवारण करण्यास आदेशित केले परंतु मुळ समस्याचे निवारण न करता या महाशयांनी “जखम मांङीला आणि मलम….” या युक्ती प्रमाणे समस्याचे निवारण न करता टाईम पास करत लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles