♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोकवर्गणीतून व डॉ योगेश डुंबरे यांच्या विशेष सहकार्यातून वनसगाव -थेटाळे‌ रस्त्याचे काम सुरू

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

येवला- लासलगाव मतदार संघातील अत्यंत महत्त्वाच्या व अनेक दिवसांपासून नेत्यांच्या आश्वासनाने प्रलंबित असलेल्या वनसगाव ते थेटाळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्यांच्या कामकाजास युद्ध पातळीवर प्रारंभ झाला असून सद्यस्थितीत दोन जेसीबी व सहा ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काम जोरात सुरू असून शेतकऱ्यांना हा कामाचा हंगाम असतानाही या ठिकाणी उभे राहून काम करावे लागत आहे.

निवडणूक आली की नेते जागे होतात आणि या रस्त्याचा प्रश्न आणि गांभीर्याने सोडू असे भावनिक आव्हान करून मत मागून आपला स्वार्थ अनेक पुढाऱ्यांनी साधला आहे, परंतु खऱ्या अर्थाने या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कानाडोळा केल्याने सर्वांनी नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहा वर्षांपासून या रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राम विजय क्लिनिकचे संचालक डॉ योगेश डुंबरे यांनी पुढाकार घेत दोन जेसीबी उपलब्ध करून दिले आहे.

जितक्याही दिवस या रस्त्यांच्या कामासाठी जेसीबी लागतील त्या काम करण्याचा सर्व खर्च डॉ योगेश डुंबरे यांनी देण्याचे आश्वासन दिले आहे. रस्त्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकरी, कामगार, वाहनधारक आदींची चर्चा करून काल या कामाला प्रारंभ केला आहे. सद्यस्थितीत हे काम अत्यंत युद्ध पातळीवर सुरू असून या कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. सहा ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती, गोटे, दगड हे गावातील स्मशानभूमी त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मटेरियल ची गरज आहे त्या ठिकाणी टाकले जात आहे. तरी या लोकवर्गणीतून होत असलेल्या खर्चासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.

वनसगाव ते कोटमगाव व वनसगाव ते थेटाळे या लासलगाव विंचूर या बाजारपेठेला जोडणारा अत्यंत जवळच्या मार्गाने कोटमगाव-वनसगाव ते वनसगाव-थेटाळे हा रोड होणे काळाची किती गरज आहे हे आज सर्व शेतकरी बांधवांना समजले असून शेतीच्या कामात व्यस्त असतानाही सर्व शेतीचे कामे बाजूला ठेवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहून आपापल्या परीने या कामात योगदान देत आहेत. खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य त्याचप्रमाणे विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम करत असलेली जिल्ह्यातील सर्व नेते यांनी वेळीच या रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिले असते तर, शेतकऱ्यांचा हा प्रलंबित प्रश्न सुटू शकला असता. परंतु आगामी निवडणुकीत आपण कोणत्या तोंडाने या लोकांकडे मत मागण्यासाठी येणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. आज स्वखर्चाने काम करायची वेळ आली आहे. निवडणुकीच्या वेळी मत मागायला आल्यावर जागेवर उत्तर मिळेल अशी तीव्र शब्दात माजी सरपंच किरण शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles