♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील विविध 508 रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचा शुभारंभ..डॉ.भारती पवार

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

देशभरातील विविध रेल्वे स्टेशनच्या पुनर्निर्माण आणि नूतनीकरणाच्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील मनमाड स्थानकावरील कार्यक्रमात आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सहभागी झाल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील विविध 508 रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचा शुभारंभ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील

मनमाड रेल्वे स्थानक आधुनिकीकरण रु ४४.८० कोटी

नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु. २०.०३ कोटी

लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु.१०.१० कोटी

नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु. १०.१४ कोटी

रुपये खर्चाच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ आज संपन्न झाला. यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या की अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत रेल्वेच्या सुविधा प्रवासासाठी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्याबरोबरच डिजिटल टेक्नॉलॉजी द्वारे रेल्वे स्टेशनवर जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील.

मनमाड बरोबरच नगरसुल,नांदगाव,लासलगाव स्थानकांचाही विकास करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर राव वाघ, दादा जाधव, नितीन पांडे, पंकज खताळ,सचिन दराडे, गणेश शिंदे, जय फुलवानी, सुवर्णा ताई जगताप,डी.के. नाना जगताप, दत्तराज छाजेड, भावराव निकम, संदिप नरवाडे, नितीन आहिराव,संजय सानप, आनंद काकडे, सुमेर मिसार, उमेश उगले, सागर फाटे, विक्रम निकम, एकनाथ बोडके तसेच भुसावळ रेल्वे विभागाचे डी.आर.एम. श्रीमती ईशा पांडे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles