♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अमृताताई पवार यांचे वनसगाव शाळा सदिच्छा भेट प्रसंगी प्रतिपादन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

देवगाव जि प गटाच्या माजी जि प सदस्या, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तसेच येवला- लासलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख (भाजपा) आर्कि अमृताताई पवार यांनी वनसगाव जि प शाळेला शालेय वास्तु संदर्भातील अडचणी संदर्भात सदिच्छा भेट देऊन जिल्हा परिषद शाळेतील समस्या जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी वनसगाव जि प शाळेची जीर्ण झालेली कौलारू शाळा, तिची दुरावस्था, फुटलेले कौले ,भिंतीला गेलेल्या तडे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक नुकसान याबाबत शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामस्थ ,शालेय समिती आदींकडून सर्व माहिती घेतली.

यावेळी वनसगावचे सामाजिक कार्यकर्ते डॉ योगेश डुंबरे,माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल डुंबरे, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्ध प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, मुख्याध्यापक आनंदा राजगुरू, केंद्रप्रमुख निंबेकर सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी जि प शाळेसाठी विविध मागण्या केल्या.

या मागण्यांमधील मुख्य मागणी म्हणून शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष झालेली जीर्ण शाळेची कौलारू इमारत याबाबत जि प शाळेची निर्लेखित प्रस्ताव हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने आपण शासकीय स्तरावर या विषयावर अधिक लक्ष घालणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपसरपंच राहुल डुंबरे, पत्रकार रामभाऊ आवारे सर, मुख्याध्यापक आनंदा राजगुरू, राजेंद्र कापडणीस सर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी जि प शाळेच्या वतीने आर्कि. अमृताताई वसंतराव पवार यांचा शालेय समितीच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी भीमराव डुंबरे, शिवाजी कापडी, पंडीत कापडी,बापु शिंदे, सुदाम शिंदे, दीपक माहेवार सर समाधान पवार सर, सुनिता शेले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंदा राजगुरू यांनी तर आभार राजेंद्र कापडणीस सर यांनी मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles