♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विद्यार्थ्यांनी आपल्यातील संशोधन वृत्तीला चालना द्यावी- यशराज पाटील

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

रयत शिक्षण संस्थेच्या, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विंचूर येथे श्री.यशराज पाटील, लासलगाव यांची न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघ येथे विज्ञान क्षेत्रात विशेष निमंत्रित वक्ता म्हणून निवड झाल्यामुळे सत्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य एन. ई देवढे यांनी यशराज पाटील यांचा सत्कार केला. संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी आपल्या प्रास्ताविकात यशराजच्या शालेय जीवनाविषयी माहिती दिली.यशराज पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना आपले कॉलेज जीवनातील अनुभव सांगताना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर नासा वेबसाईट चेक करून त्यावरील संशोधन विषयक बातम्या वाचण्याची सवय लागली.

त्यातून पुढे त्यांच्यात विज्ञान क्षेत्रात आवड निर्माण झाली.आपले आय.टी.चे शिक्षण पूर्ण करत असतानाच लडाख मध्ये जाऊन जिओ लॉजिस्ट, पर्यावरणाविषयी संशोधन केले. नासाने तयार केलेले सॅटेलाइट व त्यांनी जमा केलेली माहिती समान होती. जगातून फेलोशिप म्हणून बारा जणांची निवड नासा करते त्यात भारतातून त्यांचीही निवड या संशोधन कार्यातून झाली. विद्यार्थ्यांना सांगताना त्यांनी सांगितले शालेय जीवनात शिक्षक लक्ष देतात आणि तुमच्यात असलेले गुण ओळखून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आपण जीवनात इतरांसोबत स्पर्धा ठेवतो तशीच आपण स्वतःशीच स्पर्धा ठेवली तर आपल्यातील संशोधन वृत्तीला चालना मिळते.

कला शाखेतील विद्यार्थ्यांचे सुद्धा सॅटेलाइट निर्मितीत योगदान असते. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती देताना इस्रोने राबविलेल्या चांद्रयान मोहिमेविषयी माहिती दिली. शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांविषयी योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जोपळे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु. कावेरी खैरे हिने मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles