♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव महाविद्यालयात नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रस्ता सुरक्षा अभियान व माता पालक दिन साजरा 

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

दि.9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संपूर्ण भारतात मेरा मिट्टी मेरा देश तसेच रस्ता सुरक्षा अभियान व माता पालक दिवस हा साजरी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आदिनाथ मोरे होते.

सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे लासलगाव महाविद्यालय येथील हॉलमध्ये जुनियर विद्यार्थ्यांना प्रवीण पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान संदर्भात अत्यंत सुंदर अशी माहिती दिली कॉलेज गेट येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ही असलीच पाहिजे तसेच निर्भया चे प्रकरण सुद्धा त्यांनी मुलांचा निदर्शनास आणून दिले.

 

माता-पालक दिवस हा साजरा करत असताना नाशिक ग्रामीणचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील यांना पालकांना जो संदेश दिला त्या प्रती लासलगाव येथील माता पालक यांनी चांगला प्रतिसाद दर्शविला आपली मुलगी पंधरा ते सोळा वर्षाची संभाळल्यानंतर ती महाविद्यालयात जात असते आणि तिच्या शिक्षणाच्या प्रती ती प्रामाणिकपणे काम करत असताना टवाळखोर मुलांकडून काही छेडछाडीचे प्रकरण तसेच बाईकवर स्टंट करणे ह्या प्रकारचे उद्योग सुरू असतात.

त्यामुळे भीतीचे वातावरण त्या मुलींवर होत असते. नासिक ग्रामीण पोलिसांमधील एक सिंघम असलेले व्यक्तिमत्व असलेले सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील यांचे वक्तव्य ऐकून लासलगाव महाविद्यालय येथील विद्यार्थी तसेच माता पालक यांना आश्वासन दिल्यानंतर आनंदी वातावरण बघावयास मिळाले.

उपस्थित सहाय्यक निरीक्षक मोटर वाहन स्वप्निल वाकळे, सहाय्यक निरीक्षक मोटर वाहन शिवाजी विभुते, पोलीस कॉन्स्टेबल वाहतूक प्रकाश सगळे, प्राचार्य आदिनाथ मोरे,उपप्राचार्य भूषण हिरे, प्राध्यापक उज्वल शेलार , सुनील गायकर, किशोर गोसावी तसेच सर्व विद्यार्थी वर्ग माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन देवेंद्र भांडे यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles