♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव शिव नदीचे होणार सुशोभीकरण,अमिषा मित्तल यांच्याकडून पाहणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

लासलगाव येथील शिव नदीची राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत नदीचे सुशोभीकरण व स्वच्छता केले जाणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.बुधवारी दुपारी शिव नदी बाजार तळ येथील पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांनी केली.

येथील शिव नदीचे राज्य नदी संवर्धन योजने अंतर्गत १६ कोटी ८० लक्ष रुपये किमतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला आहे.

राज्याचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात लासलगाव शिव नदी सुशोभीकरण व स्वच्छता प्रस्ताव मंजुरी साठी राज्य सरकारचे मुख्य सचिव यांच्या कार्यालयातून नाशिकचे मुख्य.कार्यकारी अधिकारी यांचे दालणात व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली.

यावेळी सरपंच जयदत्त होळकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व)दिपक पाटील,निफाड पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश पाटील,ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यावेळी उपस्थित होते.

 

या बैठकीत चर्चा झाल्या नुसार बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांनी लासलगाव येथे प्रत्यक्षात येऊन शिवनदीची पाहणी केली.यावेळी सरपंच जयदत्त होळकर यांनी नदीचे संवर्धना बाबत माहिती दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles