♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील नवीन नेतृत्व,एकच कॉल प्रॉब्लेम सॉल -बाळासाहेब होळकर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

तरुणांच्या गळ्यातील ताईत , युवा पिढी मध्ये एक
वेगळी ओळख, छाप निर्माण करणारा तरुण मित्र बाळासाहेब उर्फ (छत्र)होळकर अडीअडचणीला धावुन येणारा, सामाजिक कार्यात होईल तेवढी मदत करणारा, ग्रामीण भागातील गाव पातळीवर लोकांच्या समस्या जाणून घेणारे व्यकिमत्त्व म्हणजे छत्र , सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेवुन काम करणार युवा नेतृत्व..कोणतेही पद प्रतिष्टा नसताना फक्त गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी लढणारा तरुण..”एकच कॉल प्रॉब्लेम सॉल” युवा पिढीसाठी एक वेगळी ओळख निर्माण करणार नेत्तत्व.

आपण जर राजकारणाचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात येते ती म्हणजे काळानुरूप बदलत जाणारं नेतृत्व आता देखील आपल्या लोकशाहीमध्ये असेच बदल घडताना आपण पाहत आहोत.

नव्या पिढीचे प्रश्न, विचार आणि आम्हाला हवे असणारे बदल हे कदाचित फार वेगळे आहेत. ज्याचा विचार करणारं नवं नेतृत्व तरुणवर्गाला आकर्षित करत आहे. आमचे प्रश्न आणि समस्या या आता वेगळ्या आहेत. आणि त्यावर आजही योग्य ते निर्णय घेताना फार उशीर होतो. हेच तरुण नेतृत्व आमच्या अनेक समस्यांचा योग्य तो तोडगा शोधताना आम्हाला दिसत आहे.

प्रस्थापित नेतृत्वावरील विश्वास आता उडाला आहे
आणि आता तरुण नेतृत्वासोबत अनेक नवीन बदल घडून येतील अशी इच्छा आहे. हे नवे नेते निदान शिक्षित, जबाबदार आणि समाजासाठी काही नवीन बदल घेऊन येत आहेत हे नक्की आहे.

आवाज कुणाचा…’ म्हटल्यावर मागून तरुणांचा दमदार आवाज ऐकू येण्याचे दिवस आता कमी झालेले दिसुन येते .आपल्यापासून दूर राहणारा, महागड्या मोबाइलवर
बोलत आलिशान गाड्यांमधून फिरणारा नेता तरुणाईला
नकोय. त्यांना नेता हवाय तो त्यांच्यामध्येच उठ-बस
करणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा, त्यांच्या समस्या
जाणून घेणारा. हाच सूर आजच्या तरुणाई मधुन व्यक्त होत आहे. . ‘तुम्ही आम्हाला किंमत देणार नसाल,तर आम्ही आम्हाला हवा तसा नवा नेता निवडू’ असा
रोखठोक संदेशच तरुणाईने प्रस्थापित नेतृत्वांना दीलेला दिसत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles