♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विंचूर एमआयडीसीतील बंद पडलेले पथदीप बसविण्यास सुरुवात.

जनहित न्यूज24 विंचूर प्रतिनिधी:सुनील क्षीरसागर

 

 गेल्या कित्येक दिवसांपासून विंचूर एमआयडीसीतील अनेक पथदिप बंद पडलेले होते तसेच महामार्गावरील मोठे पथदीप बंद पडल्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघात होत असतात.

विंचूर वसाहतीमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आल्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे रात्री अपरात्री महिला व पुरुष कर्मचारी वर्गांना या ठिकाण प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विंचूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रोहन सरोदे यांनी नाशिक पदवीधर विधान परिषद आमदार सत्यजित दादा तांबे व मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांना विंचूर एमआयडीसी ची समस्यांबाबत कळविले होते.

 

आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेमध्ये पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीतील पायाभूत सुविधांचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एमआयडीसीतील पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे अशी त्यांनी मागणी केली होती.

विंचूर एमआयडीसीतील पथदीप बदलण्यात येत असल्याने एमआयडीसीतील कर्मचारी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.

 

रोहन सरोदे यांनी याआधीही तिसऱ्या फेज मधला रस्ता होण्यासाठी व मेक इन इंडिया मध्ये विंचूर येथे उद्योग येण्यासाठी तत्कालीन नाशिक जिल्ह्याचे निमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अजूनही काही मागण्या प्रलंबित आहे त्यामध्ये 1)रस्तावरील खड्डे अर्धवट बुजविले . तिसऱ्या फेज मधील रस्त्याचे अतिशय निकृष्ट काम.
2) एमआयडीसीचे कार्यालय स्थापन करावे.
जेणेकरून उद्योजकांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्यात येतील प्रत्येक कामाला नाशिकच्या ऑफिसला जाण्याची उद्योजकांना गरज पडणार नाही.
3) सी एस आर फंडातून परिसरात कंपन्यांनी विकास करावा..

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles