♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नाशिक आयुक्तालयातर्फे प्रभावी उपाययोजना

जनहित न्यूज24 नासिक विशेष प्रतिनिधी:रोशन गव्हाणे

सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर दुत कार्यशाळेचे आयोजन मा. श्री. अंकुश शिंदे सर पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची ‘संकल्पना’

मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर श्री. अंकुश शिंदे सर यांच्या संकल्पनेने आणि पोलीस उपायुक्त, गुन्हे मा. श्री. प्रशांत बच्छाव सो. यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी ‘भिष्मराज बाम सभागृह’ पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर गुन्हे जनजागृती करण्यासाठी ‘सायबर दुत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयुक्तालय हद्दीतील विविध महाविद्यालयातील विदयार्थी व शिक्षक यांना सायबर गुन्हे व त्यांच्यापासुन बचाव कसा करता येईल याबाबत प्रशिक्षित करुन त्यांच्या माध्यमातुन शहरात मोठ्‌या प्रमाणावर सायबर गुन्हयांविषयी जनजागृती व्हावी हा यामागचा मुळ हेतु आहे.

सध्या सर्वच ठिकाणी पारंपारीक पध्दतीने होणारे गुन्हे, फसवणुक यापेक्षाही सोशल मिडीया जसे- फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉटस्अप, इंटरनेट तसेच ऑनलाईन पध्दतीचा वापर करून होणारे आर्थीक गुन्हयांचे प्रमाणात दिवसे दिवस वाढ होत आहे. सर्वच नागरीक स्मार्ट फोनचा वापर करून या सर्व सोशल मिडीयाचा देखील सर्रास वापर करतांना दिसतात. परंतु काही शिक्षीत विदयार्थी किंवा नागरीक वगळता बहुतेक नागरीकांना सोशल मिडीयाचा सुरक्षीत वापर कसा करावा याबाबतचे अज्ञान असल्याने सायबर गुन्हेगार या संधीचा फायदा घेवुन भिती अथवा आमिष दाखवुन अशा नागरीकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात फसवतात. विशेषतः पारंपारीक गुन्हयापेक्षा या गुन्हयातील गुन्हेगार तज्ञ, चलाख असुन ते अंत्यत दुरवर राहुन असे गुन्हे करीत असतात.
नागरीक ज्यावेळी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार घेवुन येतात त्यावेळी ते अंत्यत दुर असल्याने त्यांना प्रत्यक्ष शोधण्यास जाणे जिकीरीचे होते. म्हणुन सायबर गुन्हे होवुच नये यासाठी नागरीकांमध्ये सोशल मिडीयाच्या सुरक्षित वापराची व सायबर गुन्हयांना प्रतिबंध करण्याची निकड लक्षात घेवुन मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी “सायबर दुत ” ही नावीन्यपुर्ण संकल्पना अस्तित्वात आणली आहे.

 

याचाच एक भाग म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करुन त्यांच्यामार्फतीने शहरातील महाविद्यालय, विविध कार्यालय तसेच रहीवासी वसाहती यांमध्ये जावुन सायबर जनजागृती करणे व सायबर गुन्हयांना आळा घालणे या मोहीमेच्या उद्देशापोटी सदर उपक्रमाच्या प्रथम टप्यात दिनांक १ मे २०२३ रोजी नाशिक शहरातील विविध २७ कॉलेज मधिल एकुण ३९२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या सायबर दुतांनी शाळा, कॉलेज तसेच ते राहत असलेल्या परिसरामध्ये विदयार्थी व नागरीकांमध्ये सायबर अवरनेसची निर्मीती करण्यासाठी पोलीसांच्या खांदयाला खांदा लावुन प्रत्येक सायबर दुतने सरासरी ८०० ते १००० नागरीकांना सायबर साक्षर केलेले आहे.

नाशिक शहराची अंदाजीत लोकसंख्या २० ते २२ लाख लक्षात घेवुन मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी अधिक सायबर दुत निर्माण करण्याचे आदेशीत केल्यानुसार सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री प्रशांत बच्छाव व मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे तज्ञ अधिकारी व अंमलदार तसेच सायबर तज्ञ यांचे वतीने उपक्रमाच्या दुस-या टप्यात आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी ०९.०० ते १४.०० वाजे पावेतो भिष्मराज सभागृह, पोलीस मुख्यालय नाशिक शहर या ठिकाणी एकुण ६२२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा प्रकारे आजपावेतो एकुण १०१४ ‘सायबर दुत’ यांना सायबर पोलीस स्टेशन कडुन प्रशिक्षित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी १ मे २०२३ रोजी प्रशिक्षीत करण्यात आलेले सायबर दुत यांनी देखील मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षणा दरम्यान मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, सर यांनी स्वतः विदयार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘सायबर दुत’ म्हणुन त्यांचे कॉलेज व रहीवासी वसाहतींमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षित सायबर दुत यांच्या मार्फतीने नाशिक शहरात सायबर गुन्हयांबाबत अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहोचण्याचा व त्यांना सायबर जागरुक करण्याबाबत आवाहन केले. उपस्थित विदयार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेवुन उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना सायबर दुत म्हणुन मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री प्रशांत बच्छाव यांनी बॅच व सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे श्री. प्रशांत बच्छाव, सर यांनी केले. ‘सायबर दुत’ उपक्रमाबाबत मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नितीन जाधव, श्री समिर बटाविया, श्री तन्मय शिंदे तसेच सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने वपोनि. श्री रियाज शेख, पोउनि श्री दानिश मन्सुरी, यांनी देखिल विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी १ मे २०२३ रोजी प्रशिक्षीत सायबर दुत यांनी सायबर अवरनेस बाबत कार्यकेल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री समिर बटाविया, श्री तन्मय शिंदे व इतर सहकारी यांचे प्रशंसापत्र | देवुन अभिनंदन केले.

सदरच्या कार्यक्रमासाठी सायबर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, रियाज शेख व त्यांचे अधिनस्त सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी कार्यशाळेच्या आयोजनामध्ये विशेष भुमिका बजावली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महीला सहा. पोलीस निरीक्षक उमा गवळी यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles