♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ङॉ.स्वप्निल पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी विषारी कोब्रा दंश झालेल्या चेतनचे वाचविले प्राण

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

लासलगाव- निमगाव वाकडा येथील चेतन सयाजी गायकर (३६) या युवकासकोब्रा या अतिविषारी नागाने दंश केल्यानंतर गंभीर परिस्थितीत लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचविल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहिले.


गुरुवारी (दि. १०)साडेनऊ वाजता चेतन आपल्या शेतातील सोयाबीनच्या पिकातून जाताना त्याच्या डाव्या पायाला कोब्रा जातीच्या विषारी नागाने दंश केल्याचे लक्षात येताच चेतनने पाय जोरात झटकला.

परंतु कोब्राने पायाला वेढा मारला होता. पायाला झटका मारून कोब्रा सर्पास लांब फेकले. प्रसंगवधान दाखवत चेतनने मोबाइलद्वारे वडिलांशी संपर्क करून बोलावले
वडिलांनी आईच्या मदतीने चेतनला दवाखान्यात आणले.

 

दवाखान्यात आणतांना चेतनची गाडीवरच शुद्ध हरपली  ,अशा परिस्थितीतही वडिलांनी धीर न सोडता दवाखान्यात दाखल केले. तोपर्यंत विष सर्व शरीरात पसरलेले होते.घटनेचे गांभीर्यओळखून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने उपचार सुरू केले.
सुरुवातीला त्याला इंजेक्शन दिले. उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यानंतर पुन्हा सात इंजेक्शन देऊन डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून चेतनला जीवदान मिळवुन दीले.
एक तासाच्या प्रयत्नानंतर चेतन पूर्ण संकटातून बाहेर आल्यानंतर कुटुंबियांनी डॉ.पाटील यांचे आभार मानले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles