♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या नूतन पाईप लाईनचे काम पूर्णत्वावर पाईप लाईनची चाचणी सुरू

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

दि.१० ऑगस्ट:-

लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असून योजनेतील सुमारे साडे सहा किलोमिटर नूतन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच नव्याने टाकण्यात आलेल्या पाईप लाईनची चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यांच्या सूचनेनुसार प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे हे गेल्या पंधरा दिवसांपासून योजनेच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असून काम जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. आज या योजनेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

यावेळी प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.निकम, शाखा अभियंता श्री.पाटील, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, गाजरवाडीचे सरपंच बाळासाहेब पुंड, छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी उदयसिंग राजपूत, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, पांडुरंग राऊत, कंत्राटदार कैलास काळे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, अनिल दाते, भास्करराव कुदळ, प्रशांत पुंड, भुषण आरोटे, भालचंद्र भुजबळ, अनिल विंचूरकर, पवन सानप यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी विंचूर येथील कार्यालयात अधिकारी व सोळा गावांच्या प्रतिनिधी समवेत बैठक घेतली होती.

या बैठकीत योजनेचे काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच गेली पंधरा दिवस प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे हे स्वतः या कामाच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. रोज सकाळी १० ते रात्री उशिरा पर्यंत प्रत्यक्ष कामाची ठिकाणी राहून कामाला अधिक वेग दिला. तसेच कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तातडीने संबंधितांना फोन करून तातडीने सोडविल्या. त्यामुळे विक्रमी वेळेत या नूतन पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

आज सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या नूतन पाईप लाईनचे काम पूर्ण होऊन योजनेच्या पाईपलाईनची चाचणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच या योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे सोळागाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles