♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रयत चषक आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विंचूर विद्यालयातय संपन्न

जनहित न्यूज24 विंचूर प्रतिनिधी:सुनिल क्षीरसागर

 

रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर गटातील विंचूर, रुई,चांदोरी, वनसगाव, टाकळी विंचूर या शाळांमध्ये 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ यांच्या कल्पनेतून आयोजित केलेल्या भव्य आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या भव्य प्रांगणात पार पडला.

या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय भगीरथ शिंदे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णा व व वहिनी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य एन ई देवढे यांनी आपल्या प्रास्ताविकात न्यू इंग्लिश स्कूल, रुई या ठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धा, न्यू इंग्लिश स्कूल, टाकळी विंचूर या ठिकाणी झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर या ठिकाणी झालेल्या खो-खो या स्पर्धांचा हेतू,नियोजन,कार्यवाही यासंबधी सर्व माहिती दिली.सर्व शाखातील खेळाडू संघ व्यवस्थापक व मुख्याध्यापक यांनी सर्व सहकार्य करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जगदीश जेऊघाले कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष होते .डॉ. सुजित गुंजाळ जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा व विंचूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थी व खेळाडूंना मार्गदर्शन करताना आदरणीय भगीरथजी शिंदे साहेब यांनी यशस्वी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्व असून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सराव करून सर्व क्रीडा प्रकारात सहभागी होऊन यश संपादित करावे .

खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक खेळ भावना निर्माण होते तसेच आपल्या शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक विकासासाठी खेळ अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून उद्याचे कविता राऊत, नीरज चोप्रा,सचिन तेंडुलकर विद्यार्थ्यांमधून घडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.विंचूर गटातील शाखांनी हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केल्याचे व पुढील वर्षी जिल्ह्यातील इतर शाखांमध्ये देखील क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील.यासाठी विंचूर शाखेने पुढाकार घ्यावा व संस्था सर्व काही सहकार्य करेल असे आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विंचूर,रुई,टाकळी विंचूर, वनसगाव, चांदोरी या विद्यालयातील वैयक्तिक क्रीडा प्रकारातील सर्व यशस्वी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले तर सांघिक खेळातील विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर या शाळेने जास्तीत जास्त प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवल्याने उत्कृष्ट क्रीडापटू शाळेचा पुरस्कार म्हणून सन्मानचिन्ह भगीरथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते विद्यालयाचे प्राचार्य एन ई देवढे यांना देण्यात आले.

तसेच या स्पर्धांसाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक विद्यालयातील क्रीडा व्यवस्थापकांचा देखील सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास जनरल बॉडी सदस्य कवडे,कैलास सोनवणे, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर , एस.डी सोमवंशी, एस.डी. लभडे, जी.एन . तेलोरे ,सी.डी. रोटे,के.जी.जोपळे, आर के चांदे, खैरनार डी.एन.,दत्तात्रय दरेकर,सागर बोराडे, ज्ञानेश्वर तासकर, किशोर केंगे, वामनराव जेऊघाले, अरुण थोरे, अशोक डुंबरे, राणोजी कापडी, पी.के.जेऊघाले,नानासाहेब जेऊघाले ,विनायक जेऊघाले, शंकर दरेकर,बापूसाहेब सोदक,संतोष जाधव,दिलीप चव्हाण,गंगाधर गोरे,सोमनाथ निकम, राजाराम दरेकर, काकळीज सर, ढवन सर अनिता सोनवणे, वर्षा वाघ, स्नेहल साळी, आरती जाधव, स्वाती धात्रक, मीरा दरेकर, सोनाली कापडणीस, जे.डी.अहिरे, डी.आर गायकवाड, व्ही.एस.गोसावी, ए.डी. चौरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, डॉक्टर असोसिएशन, पत्रकार संघ, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आर के चांदे यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles