♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव शहरात परराज्यातून आलेल्या नागरिकांची चौकशी करावी- मनसे शहराध्यक्ष अमित गंभीरे

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

आशिया खंडातील कांद्याची नावाजलेली बाजारपेठ असलेले लासलगाव येथे मागील एक दोन वर्षात परिसरातील अनेक राज्याचे परप्रांतीय आपला उदरनिर्वाह करण्याचा उद्देशाने आलेला आहे परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात तसेच लासलगाव ग्रामपंचायत मध्ये दिलेली नाही किंवा कळविले नाही.

सदरील लोकांची माहिती हे लोक जिथे काम करतात त्या संबंधित व्यक्तीकडून आपल्या पोलीस ठाण्याच्या दप्तरी माहिती द्यावी जेणेकरून लासलगाव परिसरात होणाऱ्या काही घटनांना आळा बसू शकेल त्याचप्रमाणे या परप्रांतीमुळे स्थानिक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे .

परप्रांतीय ठेकेदार हा पर राज्यातून काही अल्पवयीन मुले घेऊन त्यांच्याकडून कामे करून घेतात त्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे या परप्रांतीयांमुळे स्थानिक लोकांना मजुरांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या परप्रांतीय लोंढ्यांमुळे स्थानिक प्रशिक्षणावर भार वाढत चालला आहे त्यामुळे त्यांना वेळीच आवर घालावा.

अन्यथा त्यांना मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्याकडे मनसे शहर अध्यक्ष अमित गंभीरे यांनी व सर्व कामगारांनी निवेदन देण्यात आले. यावेळी अमित गंभीरे मनसे शहराध्यक्ष, सागर सस्कर ,भरत भंडारी ,सुनील खलसे ,सुभाष जाधव ,संभाजी रावते, हर्षद पठाण, उत्पन्न सुशील पेंटर विशाल शेजवळ विजय आशान.आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles