♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये १५ ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाॅ. संगिता सुरसे मॅम यांनी भूषविले.तसेच कार्यक्रमास शाळेच्या संचालिका सौ.मनीषा होळकर ,सौ. नंदा डमरे , सौ रश्मी दगडे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच पालक वर्ग व उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभागी झाले होते.

शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात परेड , लेझीम आणि नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिम सर , आणि शाळेची विद्यार्थीनी शारिया शेख यांनी केले. शाळेच्या शिक्षिका मनिषा अभंग यांनी देशभक्तिपर गीत गाऊन वातावरणात ऊर्जा निर्माण केली .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या उप-प्राचार्या मंगला कदम, सह शिक्षिका सारिका पाटिल , दिपाली नाईक, सुरेखा भावसार ,शबाना काद्री ,योगिता पाटिल, अनुश्री कदम, प्रतिभा बोरसे, शिरिन शेख, प्रमिला रायते, नम्रता गरड, सविता दरेकर, किशन बत्तीसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles