♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १५ ऑगस्ट ७७ वा स्वातंत्र्यदिन दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी नु.वि.प्र. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मा.श्री.प्रकाश पाटील, मा.श्री.हसमुखभाई पटेल, मा.श्री.संदीप होळकर, मा.श्री.चंद्रशेखर होळकर, मा.श्री.सचिन मालपाणी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री.सत्तार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अगणित वीरांच्या बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला.

आज या गौरवशाली घटनेला ७६ वर्षे पुर्ण झाली. अनेकांनी यासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. आपणा सर्वांच्या एकजुटीने स्वातंत्र्य आणि लोकशाही भक्कम करुया तसेच देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मजबूत करण्याचा स्वातंत्र्य दिनी दृढ निर्धार करुया, असे आवाहन प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी उपस्थितांना केले.

यानिमित्त माजी सैनिक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेतून देश सेवेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी देखील याप्रसंगी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमानंतर मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध गावांमधून संकलित केलेली माती वापरून महाविद्यालयाच्या परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles