♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भ्रष्टाचार विरोधात आम आदमी पार्टी नासिककडून तिरंगा रॅली काढण्यात आली

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

१५ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आम आदमी पार्टीकडून प्रमूख अतिथी श्री.दिनकर पवार,रिटा.सुभेदार मेजर आणि जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन नासिक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

त्यानंतर सकाळी १० वाजता त्याच ठिकाणाहून तिरंगा रॅलीची सुरवात होऊन नाशिक शहरातील इंदिरा नगर, नासिक रोड, द्वारका सर्कल, मुंबई नाका, सिबीएस, आर के सर्कल, निमाणी, सिडको, पाथर्डी फाटा आणि ईतर मुख्य रस्त्यावरुन जात, भ्रष्टाचार विरोधात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, रॅलीचा शेवट राजीव गांधी भवन या महानगरपालिकेच्या मुख्यद्वारावर करण्यात आला.

 

देश्यात आज जे अस्थिऱतेचे वातावरण भाजपा सत्ताधाऱ्यांनी निर्माण केले आहे, त्यामुळे समाजातील नागरिक देशात भेदरलेल्या अवस्थेत आहेत, तसेच नाशिक शहरातील सरकारी विभागात सामान्य लोकांनी, सरकारी बाबूंना पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही आहे, अशी भ्रष्टाचारी व्यवस्था सरकारने निर्माण केली आहे, या विरोधात,आम आदमी पार्टीने शहरातील मुख्य रस्त्यांवरून जनतेला अभिवादन करीत, सत्याच्या लढाईत आणि आपला देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीला साथ द्यावी अशी विनंती तिरंगा रॅलीत ‘आप’ नाशिककडून करण्यात आली.

हा सर्व नयनरम्य सोहळा आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी शहरातील जनता रस्त्याच्या कडेने मोठ्या संख्येने उपस्थित होती, यावेळी तिरंगा रॅलीत जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले पाटील, मध्य विधानसभा अध्यक्ष प्रभाकर वायचळे अनिल फोकणे दिपक सरोदे चंद्रशेखर महानुभाव संतोष राऊत अभिजीत गोसावी गणेश मोटवाणी शरद बोडके बाळासाहेब बोडके गोरखनाथ आव्हाड स्वप्निल घिया दत्ता पवार नूतन कोरडे विशाल वडघुले अमोल लाडंगे संदीप गोडसे अल्ताफ शेख अनिल कौशिक साहिल सिंग निर्मला दाणी जयश्री जाधव प्रमोदनी चव्हान एकनाथ साळवे सुमित शर्मा सुमित यादव शुभम पडवळ
ईत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles