♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बाभुळगांव ता.येवला येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालय मध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.

संस्थेचे संचालक, कुणाल दराडे फाऊंडेशन चे संस्थापक माननीय श्री कुणाल भाऊ दराडे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

 

यावेळी बोलताना श्री.कुणालभाऊ दराडे म्हणाले की देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ति आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे . स्वतःची तसेच परिवाराची आरोग्याची काळजी घ्यावी. याशिवाय प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तेवढा व्यायाम करावा.

 

माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. पी .पी. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . प्राचार्य डॉ डी. एम यादव यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी प्राचार्य डॉ डी. एम यादव , रजिस्ट्रार प्रा. डी. पी. क्षीरसागर ,सिविल विभागप्रमुख डॉ.उबेद अन्सारी, ईतरविभागप्रमुख,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री रुपेश भाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles