♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक पोलिसांची मोठी कारवाई अवैधपणे गुटखा विक्री करण्याकरीता साठवणुक करणारा जेरबंद लाखोंचा गुटखा जप्त

जनहित न्यूज24 ,नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

अवैधपणे गुटखा विक्री करण्याकरीता साठवणुक करणारा जेरबंद गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगीरी

श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत असलेल्या अन्न पदार्थाची व तंबाखूची अवैधपणे विक्री करणारे इसमांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत.

त्या अनुषंगाने दि. १५/०८/२०२३ रोजी गुन्हे शाखा, युनीट १, नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोअं / २५४४ मुक्तार निहाल शेख यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा) अवैद्य विक्री करण्याकरीता बीडी कामगार नगर येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील एका खोलीमध्ये साठवणुक करून ठेवलेला आहे.

सदरची माहीती वपोनिरी. श्री. विजय ढमाळ यांना कळविली असता, वपोनिरी श्री. विजय ढमाळ यांनी पोउनि / चेतन श्रीवंत पोहवा / १०९ प्रविण अशोक वाघमारे, पोहवा २२१ / योगीराज यशवंत गायकवाड, पोहवा / ९०० संदिप जयराम भांड, पोना / १९०० विशाल भास्कर देवरे, पोहवा / ७९१ रामदास गंगाधर भडांगे, पोशि २५४४ मुख्तार निहाल शेख, पोअं / २४५० राजेश राठोड, चापोहवा / १३१६ नाजिमखान फकीर मोहम्मद पठाण अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मोहटा देवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सिमेंट पत्रांचे चाळीतील खोल्याची पाहणी केली असता तेथील सिमेंट पत्रांचे खोलीसमोर एक इसम उभा असलेला दिसुन आला त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव उमेश बाळु लुंगे, वय – ३० वर्षे, रा- घर नं ५४१ स्वामी विवेकानंद नगर बीडी कामगार नगर नाशिक असे सांगुन सदर खोलीची झडती घेतली असता सदर खोलीत बेकायदेशीर पणे विक्री करीता साठवणुक करून ठेवलेला एकुण किंमत रुपये ४,३१,६७०/- रु. किंमतीचा प्रतिबंधीत असलेला अन्न पदार्थ व सुगंधी तंबाखूचा माल (गुटखा )मिळुन आल्याने तो जप्त करून सरकारतर्फे पोहवा / ७१९ रामदास भडांगे यांनी फिर्याद देवुन उमेश बाळु लुंगे याचे विरुध्द आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी  श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त , श्री. प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, विष्णु उगले, सपोउपनिरी सुगन साबरे, रविंद्र बागुल, पोहवा / रामदास भडांगे, नाजीम पठाण, प्रविण वाघमारे, योगीराज गायकवाड, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, पोना / विशाल देवरे, विशाल काठे, महेश साळुंके, पोलीस अंमलदार / मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ, चालक सपोउनि / किरण शिरसाठ यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles