♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी सर्व योजना राबवणार -सौ. सुवर्णा जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव येथे विक्रमी १०२३ जनांचा विमा ..

आभा कार्ड – ६८३

बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जनसंपर्क अभियान अंतर्गत लासलगाव येथील श्री गणेश मंदिर, गणेश नगर येथे भव्य डाक मेळावा घेण्यात आला.
भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सुवर्णा जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डाक विमा योजना व आभा कार्ड याचे महत्त्व आलेल्या सर्वांना सांगितले. फक्त रू 396 मध्ये दहा लाखाचा विमा ही योजना सामान्य जनतेसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे याचे सांगितले.आभा कार्ड हे हेल्थ रेकॉर्ड साठी फायदेशीर असून सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले आणि विशेषतः महिलांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले.

लासलगाव पोस्ट इन्स्पेक्टर राजेंद्र वानखेडे यांनी
पोस्टाच्या सर्व योजना समजावून सांगताना नाममात्र पैशात १० लाखाची कॅशलेस विमा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे असे सांगितले.

सौ.सुवर्णा जगताप या सामाजिक कार्य करताना शासनाच्या व इतर लोकाभिमुख योजना सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात आणि यासाठी वेळोवेळी त्या स्वखर्चातून कार्यक्रम आयोजित करतात हा डाक मेळावा यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे प्रयत्न चालु होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांदवड डाक विभाग विभागातील डी आर दिवेकर अनिल सोनवणे पाचोरा येथील पोस्ट मास्तर प्रकाश नागरे तसेच चांदवड व पाचोरे येथील डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी सौ.सुवर्णा जगताप ,डिके नाना जगताप ,राजेंद्र चाफेकर ,दत्तू लालजी शर्मा ,काका दरेकर ,निलेश बापू लचके,ज्ञानेश्वर शिंदे,संजय नेवगे ,नितीन शर्मा ,डॉक्टर सालगुडे ,सोमनाथ गांगुर्दे,धनंजय गांगुर्डे ,निलेश जगताप ,मनीष चोपडा ,पियुष बंब ,बाळासाहेब रायते,नरहरी कापडी,राजीव जाधव,पियुष जैन,अक्षय शिंदे,सुनील शिंदे,लक्ष्मण खलसे ,सुरेश पाथरे ,भोला पवार ,भालेराव सर,सुनील सानप,कैलास जैन,अभिजित लचके,नंदा शर्मा,रूपा केदारे,रंजना शिंदे ,शैलजा भावसार ,संगीता सुरसे ,ऐश्वर्या जगताप ,उषा कुमावत ,अनिता खैरे ,श्वेता लचके ,प्रिया लचके ,सोनाली शिंदे ,संगीता पाटील ,रजनी लसके ,कविता लोहारकर ,ज्योती जयंत ,रूपाली उगलमुगले ,अनिता कुराडे ,संजीवनी कांबळे ,शोभा शेजवळ ,पूजा राऊत तसेच या भागातील आशा वर्कर्स उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles