♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील जेष्ठ नागरिक संघाची मंत्री भुजबळ यांनी का घेतली दखल? बघा जनहित न्यूज24 वर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांनी स्वातंत्र्य दिन एक अनोख्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाईक रॅली काढून जो आनंदोत्सव साजरा केला, त्याची दखल संपूर्ण नाशिक जिल्ह्यात झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

भुजबळ साहेब यांनीही ज्येष्ठ नागरिक संघाची दखल घेतल्याने त्यांचे स्वीय सहाय्यक लोखंडे यांनी तात्काळ लासलगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघास भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या .

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक नाना होळकर यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त केले तसेच लासलगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच जयदत्त काका होळकर यांनीही भेट देत पुढील कामास गती कशी देता येईल याचा प्रयत्न अवश्य करू असे वक्तव्य केले.

यावेळी अशोक नाना होळकर (अध्यक्ष दीर्घायु ज्येष्ठ नागरिक संस्था लासलगाव), श्री जयदत्त काका होळकर (सरपंच ग्रामपालिका लासलगाव), श्री दत्तात्रेय डुकरे (सरपंच सारोळे खुर्द), पांडुरंग राऊत, अरविंद देसाई (ज्येष्ठ पत्रकार), शिवाजी होळकर, विकास जाधव, अनिल विंचूरकर आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles