♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्रावणमहिन्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे भाविकांसाठी विशेष व्यवस्था…….

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:नासिक ब्युरोचीफ रोशन गव्हाणे

 श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मा विश्वस्थ मंडळातर्फ़े श्रावणमास २०२३ चे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आलेले आहे.

श्रावण महिन्यात भाविकांना पूर्व दरवाजा येथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलीत दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, यामुळे हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी उभे राहू शकतील.

दर्शन रांगेत जेष्ठ मंडळींना बसण्यासाठी व्यवस्था,स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे शुध्द पाण्याची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे. श्रावण महिन्याकरीता मा. विश्वस्त मंडळातर्फे खालील नियोजन करण्यात आलेले आहे.

१) श्रावण महिन्यात श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळही पहाटे ५:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत राहील.

२) प्रत्येक श्रावण सोमवारी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उपडण्याची वेळही पहाटे ४:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत राहील.

३) गावकरी यांना दर्शन वेळ सकाळी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उघडल्यापासून ते १०:३० वाजेपर्यंत सायंकाळी ६:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत राहील.

४) गावकरी यांना दर्शनास येताना स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र आणणे बंधनकारक राहील.

५) गावकरी यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. तसेच दर्शनासाठी मंदिरात गावकऱ्यांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजेच जाळीगेटने प्रवेश दिला जाईल.

६) धर्मदर्शन रोग पूर्व दरवाजा व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजा येथून राहील.

वरील अनुषंगाने श्रावणमासाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles