♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

१६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे लवकर पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ

जनहित न्यूज24 : सुनील क्षिरसागर विं

विंचूर-लासलगाव १६ गावे प्रादेशिकपाणी पुरवठा योजनेच्या फिल्टरेशन प्लँटची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली.

पाहणी दरम्यान त्यांनी योजनेची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.


यावेळी त्यांच्या समवेत गट विकास अधिकारी महेश पाटील, निवासी नायब तहसिलदार सुजाता वायळ, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, लासलगावचे सरपंच तथा ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


लासलगाव विंचूर सोळा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या साडे सहा कि.मी पाईपलाईन नव्याने बसविण्यात आल्याने सद्यस्थितीत गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच येणाऱ्या काळात या योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे विजेची बचत होणार आहे.

या योजनेचे संपूर्ण नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करून गावांना होणारा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles