♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पावसाने दडी मारल्याने निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – बबन शिंदे

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

यंदा पावसाने सुरुवातीपासूनचं लपंडाव सुरु केला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती.

यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा जाताना दिसत आहे. यामुळे खरीप पिके पुन्हा धोक्यात आली आहेत. तर भर पावसाळ्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावरुन बबन शिंदे यांनी निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुसळधार पाऊस नसल्याने तसंच किडींना पोषक वातावरण असल्यानं पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनि आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याचं चित्र निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

१ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागात पावसाचं प्रमाण सरासरी पेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. ही परिस्थिती भीषण असून पीक हातातून निघून गेलं आहे. हे पाहता शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणं आवश्यक आहे. यासोबत महाराष्ट्र सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles