♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना जीएसटी विषयी मार्गदर्शन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

काकासाहेब नगर,येथील के.के.वाघ ज्युनिअर कॉलेज येथे वाणिज्य विभागातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लासलगाव महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.सुनिल गायकर यांनी ‘जीएसटी’ विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

जीएसटी अॅक्ट कसा अस्तित्वात आला तसेच या जीएसटीमुळे कोणकोणते बदल झाले आणि जीएसटी मुळे सध्या देशात अप्रत्यक्ष स्वरूपाचा फक्त एकच कर अस्तित्वात असल्याने विविध प्रकारच्या करांपासून ग्राहकांना दिलासा मिळाला तसेच सध्या जीएसटी मुळे या क्षेत्रात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत असे प्रतिपादन प्रा.सुनिल गायकर यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल उशीर आणि प्रणिता कुयटे या विद्यार्थिनींनी केले तर प्रास्ताविक प्रा.योगेश पुंड यांनी केले आणि प्रा.किरण शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे प्रा.किरण शिंदे, प्रा.योगेश पुंड, विज्ञान विभागाचे प्रा.विकास शिंदे, प्रा.गणेश आवारे, प्रा.सोनाली आढाव, प्रा.सचिन कोल्हे, प्रा.भाग्यश्री खरक, प्रा.उत्तम कर्वे, प्रा.शादाब शेख, प्रा.संदीप शिंदे तसेच श्री.योगेश खैरे व इयत्ता अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शरद कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.किरण शिंदे, प्रा.योगेश पुंड यांनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles