♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अंबड पोलीस स्टेशन(नासिक) व गुन्हे शाखेची दबंग कामगिरी खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी सह पाच आरोपी अवघ्या तिन तासात ताब्यात

जनहित न्यूज24 नासिक चिफब्युरो:रोशन गव्हाणे

मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सो. यांचे आदेशाने आणि मा.श्री. प्रशांत बच्छाव सो., पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. श्रीमती मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त, परि २, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी उकृष्ट कामगिरी करत अंबड येथील खुनाचे गुन्हातील आरोपीतांच्या तिन तासात मुसक्या आवळल्या आहेत.

आज दिनांक २४/०८/२०२३ रोजी सांयकाळी ०५.०० वा. चु सुमारास शिवाजी चौक, भाजी मार्केट, सिडको, नासिक या ठिकाणी जुन्या भांडणांच्या कारणावरुन संदिप प्रकाश आठवले वय २२ रा. दत्त चौक, सिडको, नासिक यास आठ आरोपीतांनी तिन मोटार सायकलवर येवुन धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले होते.

त्यात तो उपचारा दरम्यात सिव्हील हॉस्पीटल नासिक येथे मयत झाला असुन त्याचा चुलत भाऊ सनि राजु आठवले यांचे फिर्यादी वरुन अंबड पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५३९ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ (२), अनु.जा.ज.अ.प्र. का. कलम ३(२) (५) प्रमाणे ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी व इतर या आरोपीतां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी मा. श्री. प्रशात बच्छाव सो, पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. श्रीमती मोनिका राऊत सो, पोलीस उप आयुक्त, परि २, मा. श्री. शेखर देशमुख सो. सहा. पोलीस आयुक्त अंबड विभाग, डॉ. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री आनंदा वाघ सहा. पोलीस आयुक्त, नासिक रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अशोक नजन पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. मनोहर कारडे पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. पंकज भालेराव, पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे अशांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन मा.श्री. अंकुश शिंदे साो. पोलीस आयुक्त साो. नासिक शहर यांचे आदेशाने परिमंडळ दोन मधिल अधिकारी व अंमलदार यांची तिन पथके व गुन्हे शाखेचे तिन पथके आरोपीचा शोधासाठी तात्काळ रवाना केले.

पोलीस उप आयुक्त गुन्हे, व पोलीस उप आयुक्त परि २ यांचे मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हयातील मुख्य आरोपी १) ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी, २) ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, ३) साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅगी मो-या, ४) अनिल प्रजापती ५) बाळा वडनेरे ६) वि.स.बालक या आरोपीतांना अवघ्या तिन तासात ताब्यात घेतले असुन इतर आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची उकृष्ठ कामगिरी अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी. पोलिस चौकी प्रभारी श्री. मनोहर कारडे, श्री. प्रमोद वाघ, एम.आय.डी.सी. पोलीस पोलीस निरीक्षक श्री. अशोक नजन, पोलिस उपनिरीक्षक श्री. संदिप पवार, पो. हवा. / रविंद्रकुमार पानसरे, पो.ना. / पवन विदेशी, पो.कॉ. जनार्दन ढाकणे, पो. कॉ. / अर्जुन कांदळकर, पो.कॉ./ किरण सोनवणे, पो. कॉ. सुरेश जाधव, पो. कॉ. / सचिन कांरे, पो. कॉ. कुणाल राठोड, पो.काँ./ समाधान, पो. कॉ. तुषार मते, पो. कॉ. / अनिल गाढवे, पो.कॉ. / दिपक अशांनी सदरची कामगिरी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles