♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विंचूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल तसेच शिवप्रतिष्ठान आक्रमक

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

विंचूर येथे एका अल्पवयीन मुलीवर जुबेर नावाच्या नराधमांने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली विंचूर येथील बजरंग मंडळ गल्लीत रहात असलेल्या 20 वर्षीय जुबेर समशेर मेवाती या तरुणाने नवीत शिकत असलेल्या 14 वर्षे अल्पवयीन मुलीला घरात बोलून तिच्यावर अत्याचार केला.

अतिशय निंदनीय कृत्याचा आज भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडळ तसेच शिवप्रतिष्ठानच्या वतीने लासलगाव पोलीस स्टेशन येथे निषेध व्यक्त करण्यात आला . लासलगाव पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल वाघ यांना दिलेल्या निवेदनात सदरील नराधमावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी व पिडीतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी यांनी अशा घटना समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत आरोपीला कठोर शासन करण्यात यावे व अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून नागरिकांनी दक्ष राहण्याबरोबर प्रशासनाने आरोपीस असे शासन करावे की पुन्हा असे दुष्कृत्य करण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असे सांगितले.

मंडल युवा अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी प्रशासनावर आमचा विश्वास आहे आरोपीवर कडक कारवाई व पीडितेला न्याय मिळावा याचे मागणी केली तसेच शहराध्यक्ष युवा आघाडी निलेश जगताप यांनी या निंदनीय कृत्याचा निषेध व्यक्त केला मंडळ उपाध्यक्ष रवी होळकर यांनी परिसरात महिलांविषयी होणाऱ्या या घटनांची जनजागृती करून सहकार्य करू असे सांगितले.

तर शहराध्यक्ष योगेश पाटील यांनी कॉलेज व शाळांमध्ये प्रबोधन करण्याची तयारी दर्शवली या वेळी शिव प्रतिष्ठान निफाड प्रांत प्रमुख महेश मोरे भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ चाफेकर भाजपा भ. वि. आघाडी जिल्हाअध्यक्ष गणेश फड टाकळी ग्रा पं सदस्य राम बोराडे धनंजय गांगुर्डे विशाल पालवे ब्राह्मण महासंघ जिल्हा उपाध्यक्ष अक्षदा जोशी भाजपा मंडल सरचिटणीस मनीषा हारळे मैत्रेयी महिला मंडळ उपाध्यक्ष स्वाती जोशी आदित्य होळकर मयूर होळकर चिराग जोशी सुरज पवार प्रसाद कहाणे उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles