♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्रावणमास निमित्त आर्ट ऑफ लिविंग च्या वैदिक धर्म संस्था माध्यमातून रुद्र पूजा संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

विंचूर आर्ट ऑफ लिविंग वैदिक धर्म संस्था च्या माध्यमातून श्रावण मास निमित्त लासलगाव येथील भगरी बाबा मंदिरात रुद्रपुजा संपन्न झाली.

या रुद्र पूजेसाठी आर्ट ऑफ लिविंग बेंगलोर आश्रम येथील स्वामी प्रणवानंदजी यांच्या सानिध्यात,पंडितजी यांच्या मंत्रघोषात पिंपळगाव येथील आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक युवराज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या भजन ने उत्साहात संपन्न झाली.

सर्वप्रथम स्वामीजींचे सौ रोहिणी जाधव,शोभा पाटील,सरला गवळी, संगीता बागुल यांनी औक्षण करून स्वागत केले. या पूजेसाठी यजमान म्हणून लासलगाव मर्चंट बँकेचे व्यवस्थापक मनोहर जाधव,रोहिणी जाधवहे होते .
रुद्र पुजेबद्दल थोडी माहिती रुद्र पुजा म्हणजे काय रुद्र पुजा प्राचीन काळापासून चालत आलेला एक पूजा आहे. या पूजेद्वारे आपल्याला आंतरिक शांती मिळते. अनेक वेदशास्त्र वचनांत रुद्रपूजेचा उल्लेख दुष्ट शक्तींच्या नायनाटासाठी केला आहे. इच्छापूर्तीसाठी रुद्रपूजा एक प्रभावी पुजा मानली आहे.

रुद्रपूजेत ६ शक्तींचे आवाहन केले प्रामुख्याने शिव, विष्णुनारायण , गणपती , सूर्य , महादेवी लक्ष्मी , सरस्वती , शक्ती आणि गुरुतत्व जग सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. जेव्हा आपण शिवला उद्देशून प्रार्थना करतो, कि जेणेकरून ह्या जगातील नकारात्मकतेमुळे होणारे परिणाम म्हणजे रोग, नैराश्य, असमाधानीपणा निघून जाऊन त्या जागी शांतता, प्रसन्नता, व आनंदी वातावरण सर्वत्र येउ देत.

हीच शांतता आपल्या मनाला, शरीराला व आत्म्याला मिळते. रुद्र पूजेसाठी आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक किशोर पाटील, बाळासाहेब कदम, कैलास उपाध्यॆ विठ्ठल पवार, वर्मा ,मोहन आव्हाड, आदित्य झांबरे, ओम डागा, दत्ता घोडके, पंकज सोनवणे, राजेंद्र चांदे, वाघ सर, ईश्वर शिंदे, डॉ संगीता सुराशे, डॉ रामलाल वाघ संतोष मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष साधक उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles