♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अपघाताचा बनाव करणा-या खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जनहित न्यूज24 नासिक चिफब्युरो:रोशन गव्हाणे

 

दिनांक 26/08/2023 रोजी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस पोलीस नाईक / 2098 परदेशी, पो. अं/ 2054 कारंजे, पोअं/ 2697 राठोड, पोअं / 2003 गाडवे, पोअं / 2346 मते असे अंबड पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयात आरोपीतांची वैद्यकिय तपासणी करणेकामी सिव्हील हॉस्पीटल, नाशिक येथे गेले होते.

त्यांचेकडील आरोपीतांची वैद्यकिय तपासणी करतांना त्यांना हॉस्पीटलमध्ये एका इसमास दोन इसम अपघात झाले असल्याचे सांगुन वैद्यकिय उपचार करण्यास आले असल्याचे दिसले. सदर ठिकाणी उपस्थित अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांना उपचारासाठी दाखल इसमाचे अंगावरील जखमा पाहून संशय आला.त्यानंतर जखमी इसमास डॉक्टारांनी तपासून मयत घोषीत केले. त्यानंतर अंबड गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ सिव्हील हॉस्पीटल येथील वैद्यकिय अधिकारी यांचेशी संपर्क साधुन काहीतरी घातपाताचा संशय असल्याचे व्यक्त केले.

उपचारासाठी दाखल केलेला इसम लागलीच मयत झाला. अंबड पोलीसींनी वेळ न दडवता उपचारासाठी हॉस्पीटल येथे दाखल करणारे इसमांना सरकारवाडा सिव्हील हॉस्पीटल पोलीस चौकीचे अंमलदार यांचे करवी ताब्यात घेवून तात्काळ सातपुर पोलीस स्टेशन व गंगापुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला. सातपुर तसेच गंगापुर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सिव्हील हॉस्पीटल येथे पोहचले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे मा. पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ -1 नाशिक शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, सरकारवाडा विभाग, व.पो.नि. पंकज भालेराव सातपुर पो. स्टे, श्रीकांत निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापुर पोलीस ठाणे, सपोनि नितीन पवार व पोउनि मोतीलाल पाटील, पोउनि / विलास मुंढे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार अशांनी आरोपीतांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली की, काल दिनांक 26/08/2023 रोजी सायंकाळी यातील मयत नामे विश्वनाथ उर्फ बबलु भिमराव सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, सातपुर, नाशिक याने आरोपी क्र याचेशी यातील साक्षीदाराशी झालेल्या किरकोळ बाचाबाची मध्ये साक्षीदाराची बाजु का घेतली या कारणावरून मयतास आरोपी क्र. 1 व 2 याने हाताने मारहाण करून आरोपी क्र. 1 याने त्याचे जवळील धारदार शस्त्राने मयतास गंभीर जखमी करून त्याचा खुन केला. यावरून सदर गुन्हा एका तासात उघडकीस आणला.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे ) समशेर रफिक शेख वय 40 वर्ष धंदा चिकन शॉपी, रा कार्बन नाका, सातपुर, नाशिक 2) दिपक अशोक सोनवणे रा. श्रमिक नगर सातपुर, नाशिक सदर कामगिरी करीता मा.श्री.अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर तसेच मा. श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ -1 नाशिक शहर, मा. सिध्देश्वर धुमाळ, सहा पोलीस आयुक्त सो, सरकावाडा विभाग, मा.श्री अंबादास भुसारे सहा पोलीस आयुक्त सो, विशेष शाखा नाशिक शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत निबांळकर,सातपुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव, सपोनि नितीन पवार, सपोनि / नरेंद्र बैसाणे, पोउनि मोतीलाल पाटील,पोउनि विलास मुंडे, पोना/ गणेश हिंडे तसेच गुन्हे शोध पथक गंगापुर, अंबड व सातपु सरकारवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सिव्हील हॉस्पीटल चोकीचे अंमलदार अशांनी केली आहे. नमुद गुन्हयाचा तपास सपोनि नितीन पवार करीत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles