♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय, प्रशासन सुस्त, रिक्त पदे तातडीने भरा शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांची मागणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव येथिल ग्रामिण रुग्णालयात अनेक रुग्ण असुविधेमुळे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. प्रशासकीय अनियंत्रणामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात अनेक असुविधा असल्याचे तक्रारी रुग्णांचे नातेवाईकांनी केल्या नंतर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव यांनी ग्रामिण रुग्णालयात अचानक भेट देऊन पाहणी केली आसता अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले.

लाखो रुपयाची क्ष -कीरण मशिनरी क्ष-कीरण तंत्रज्ञ नसल्याने धुळखात पङली असुन जिल्हा वैद्यकीय अधिकारी साहेबांनी जिल्हा भरातील ग्रामिण रुग्णालयांना भेटी देवुन समस्या जाणुन घ्याव्यात रुग्णांद्वारे अशी मागणी होत आहे

गेल्या आठ महिन्यांपासुन शव-विच्छेदन गृहाचे काम पुर्ण होवुनही ते बंदच आहे नवीन बांधलेले प्रसुति गृह बंद स्थितीत आहे.

आज पर्यंत रुग्णालयातील कारभार प्रभारी वैद्यकीय आधिक्षक सांभाळत आहे वैद्यकीय अधिकारी वेळोवेळी रजेवर असतात दुपारी एक वाजेनंतर रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसतात अशा वेळेस रुग्णाला दवाखान्यात नेले असता कसलेही कारण नसताना पुढील उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी रूग्णांना रेफर टू निफाङ अथवा नाशिक केल्या जाते.

वैद्यकीय अधीक्षक यांचा अधिकारी तथा कर्मचारी व परिचारिका यांचेवर कुठलाही वचक नसल्यामुळे अधिकारी तथा परिचारिकेची असभ्य वर्तणुकी मुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामिण रुग्णालयात रिक्तपदे असून वर्ग 3 ची अनेक पदे रिक्त आहेत पूर्ण पदे भरलेली नसून कर्मचार्याअभावी अशिया खंङातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या शहरात रुग्णालयातील कारभार रामभरोसे आहे रुग्णालयात कर्मचाऱ्याचा तुटवडा असून अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत एकूण पदापैकी ११ पदे रिक्त असून प्रत्यक्षात १७ पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाचा भार आहे.

यातील अधिपरिचरिका वर्ग 3 ची 4 पदे रिक्त असून रुग्णांची सेवा करताना अधिपरिचारिकेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे महत्वाची वर्ग १चे १ पद रिक्त असून वर्ग ३ व ४ ची एकूण ११ पदे ग्रामिण रुग्णालयात रिक्त आहेत सोबतच तज्ञ हे पद सुद्धा रिक्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामिण रुग्णालयात होत असलेला प्रकार बघता राज्याच्या भुजबळांच्या स्मार्ट सिटीत काय सुरू आहे हा सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.
राज्याचे मंत्री मा. छगन राव भुजबळ यांचा लासलगाव बालेकिल्ला आहे, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारतीताई पवारांचा मतदार संघ आसुन सगळीकडे डिजिटल इंडिया चा गाजावाजा होत असताना मात्र त्यांच्याच दिव्याखाली अंधार असे चित्र जनतेला पाहायला मिळतं आहे.

ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय टाळावी त्वरित रिक्त पदे भरून काढावी,संबंधित अधिकारी तथा परिचारिका कर्मचारी यांचे मुळे होत असलेली रुग्णाची गैर सोय, वैद्यकीय असुविध इ. प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी व नवीन बांधलेले प्रस्तुतीगृह, शव विच्छेदन गृह सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles