♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आयुष्यात शिक्षणच अपुर्णतेकडुन पुर्णत्वाकडे नेते– महेश पाटील

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

माणसाचे आयुष्य अपुर्ण आहे. ते पुर्ण करण्यासाठी शिक्षणच हाच पर्याय असुन शिक्षणच माणसाला अपुर्णत्वाकडुन पुर्णत्वाकडे नेते असे प्रतिपादन निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच यांच्या वतीने आयोजित दहावी व बारावी प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .

पाटील पुढे म्हणाले की माणसाला आयुष्यात सगळे मिळत असते त्यासाठी कष्ट आणि मेहनत महत्त्वाची असून त्यासोबत शिक्षणही तितकेच बोलायचे आहे त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नसून शिक्षण माणसाला कधीच अपूर्ण ठेवत नाही तर तो पूर्णत्वाकडे जाऊ शकतो त्यासाठी शिक्षणाचा पाया भक्कम असला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

भुईमुगाचे दाणे मोठे असले तरी त्याचे आयुष्य फक्त चार महिने असते परंतु वडाच्या झाडाचे बी अतिशय राईच्या दाण्याएवढे असले तरी सुद्धा त्या दाण्यामध्ये वटवृक्ष निर्माण करण्याची ताकद असते. शिक्षणातून माणसाला समृद्ध होण्याची ताकद तेव्हाच मिळते जेव्हा आपला दृष्टिकोन मोठा असतो.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. अश्विनीताई बोरस्ते यांनी आपल्या मनोगतातुन महिलांच्या उत्क्रांतीला हातभार लावण्यासाठी महिला सक्षम असल्या पाहिजे.

त्यातूनच त्यांची क्रांती होऊ शकते, जर महिलांचे सबलीकरण व संघटन झाले तर ती आपल्या संसाराला हातभार लावून जगाच्या पाठीवर एक वेगळेपण जपण्याचे धाडस निर्माण करू शकते.

असे प्रतिपादन डॉ. बोरस्ते यांनी केले. महिलाना़ं विविध संधी मिळत असते त्या संधीचे सोने करावे जेणेकरून महिलानां आपल्या आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन आपले अस्तित्व जपता येईल असे उदगार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णताई जगताप यांनी केले. समाजामध्ये महिलांना कितपत आरक्षण मिळाले यावर विचार मंथन करण्याची खरी गरज आहे अजून कितीतरी महिला अंधारात साज पडत आहेत त्यांना दिशा देण्याचे काम आपण एकत्र आलो तर निश्चितच अशा महिलांना आशेचा किरण सापडेल गिरजा महिला म्हणजे च्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण आणि संघटनेच्या माध्यमातून हे गिरिजा परिवार महिलांना एक दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिभाताई जाधव यांनी केले.

यावेळी.गटविकास अधिकारी महेश पाटील,विस्तार अधिकारी वसंत गायकवाड, दत्तात्रय घोडके, विजय वर्मा, गिरणा गौरवचे संचालक रतन पिगंट, मुकुंद ताकाटे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अश्विनीताई बोरस्ते, प्रदेश सरचिटणीस प्रतिभा म्हस्के, लासलगाव बाजार समितीच्या माजी चेअरमन सौ सुवर्णा जगताप ,डॉ. प्रतिभा जाधव,गिरजा महिला मंचच्या निफाड तालुका अध्यक्षा कल्पना माने, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री चौधरी, सचिव भारती निकम,कार्याध्यक्ष माधुरी भावनाथ, सटाणा तालुका अध्यक्ष पुजा दंडगव्हाळ, येवला तालुका अध्यक्ष पुनमताई वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गिरीजा महिला मंचच्या मनीषा निकम, अर्चना डुंबरे,मनिषा वाघ, सुवर्णा खालकर, वैशाली शिंदे, संगिता आव्हाड,मयुरी भडांगे,स्वाती बुड,अनिता जाधव,सारिका सोनवणे,वंदना डागा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.संगिता सुरसे यांनी केले. सुत्रसंचालन कांचनमाला हुजरे व अक्षता जोशी यांनी केले तर आभार आशा पगारे यांनी माणले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कविता चव्हाण अनिता देसाई मनीषा वाघ वैशाली शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles