♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे बाबा अमरनाथ भंडारा 25 ते 30 हजार भक्तांचे आगमन पिंपळगाव नजिक येथील भोले भक्तांचा व महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक मध्ये कोरोना नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय दिसून आला पिंपळगाव नजीक येथील सरपंच तसेच ग्रामस्थांसह महिलाही मोठ्या प्रमाणात जय भोले चा गजर करत बाबा अमरनाथ यांचा भंडारा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

25 ते 30 हजार भाविकांनी दाळ बट्टी चे आणि चूरमा तसेच बटाटा भाजी यांचा प्रसाद सेवन करण्यात आला परिसरातील महिलांचा , लहान मुलांचाही उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला .

भोलेच्या भक्तांची सेवा करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर दिसून आली नाही महिलांनी, तसेच पुरुषांनीही मोठ्या प्रमाणात सेवा देत जय भोले चा नाराजी अत्यंत आनंदाने भंडारा साजरा करण्यात आला.

निफाड तालुक्यातील लासलगाव तसेच पिंपळगाव नजीक येथे मोठ्या प्रमाणात भंडारा श्रावण महिन्यात करण्यात येतो त्यासाठी परिसरातील नागरिक तसेच हिरा महाराज यांची टीम फार मोठ्या प्रमाणात सेवा देण्यामध्ये दंग असते कोणत्याही प्रकारचा वशिला न लावता हे सर्व नियोजन परिसरातील नागरिक तसेच महिलावर्ग योगदान देऊन संपूर्ण भंडारा व्यवस्थित रित्या पार पाडत होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles