♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री. गणेशोत्सव सन २०२३ व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने मा. अपर पोलीस महासंचालक यांचेकडून घेण्यात आला आढावा

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

सन २०२३ मध्ये मोठया उत्साहात श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद संपूर्ण राज्यात तसेच नाशिक शहरात साजरा करण्यासाठी नागरीक सुसज्य आहेत.

त्या अनुषंगाने मा. डॉ. रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नाशिक जिल्हा व परिक्षेत्र निरक्षण अधिकारी म्हणुन दिनांक ०६/०९/२०२३ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली.

सदर बैठकीत नाशिक जिल्हयातील व परिक्षेत्रातील श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमीत्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला त्यासोबत कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेण्यात आली. श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात तसेच विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त स्वयंसेवक व विशेष पोलीस अधिकारी यांचा वापर करावा तसेच ड्रोनचा वापर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.

गणेश उत्सव काळात डी.जे. न वाजवण्याबाबत गणेशमंडळांमध्ये जनजागृती करावी याबाबत सुचना देण्यात आल्या.

श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बंदोबस्ताचे नियोजन करुन गुन्हेगार वृत्तीचे इसमांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करावी जेणे करुन कायदा व सुव्यवस्था आबाधीत यहील या संदर्भाने मा. डॉ. रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सुचना देवून मार्गदर्शन केले.

सदर बैठकीस मा. डॉ. रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री.बी.जी.शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामिण, मा. श्री. संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. श्री. पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार, सर्व पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक, जळगांव हे उपस्थीत होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles