♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डॉ.भारती पवार व छगन भुजबळ यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडविण्याची शिवसेनेची मागणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव :- लासलगाव ग्रामीण रुग्णालयात अपूर्ण मंजूर पदे, सोयीसुविधा यांचा अभाव यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे या समस्यांसाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव यांच्या मागणी नंतर येथील प्रसूतीगृह सुरू झाले असले तरी अजूनही समस्या जैसे थे च असून याकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार तसेच मा.छगन भुजबळ यांनी लक्ष घालून समस्या सोडवाव्या अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नवीन प्रसूतीगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र येथे मंजूर भुलतज्ञ हे पद अद्यापही रिक्त असल्याने सिझेरियन अथवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना निफाड किंवा नाशिक गाठावे लागते.

चार वर्षापासून रिक्त असलेले क्ष-किरण तंत्रज्ञ कंत्राटी कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर संसर्गजन्य रोग डायबिटीज, बीपी इत्यादी संसर्गजन्य रोगांवर विभागात डॉक्टरांची देखील कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे ही समाधानाची बाब असली तरी वैद्यकीय अधीक्षक १ पद, वैद्यकीय अधिकारी वर्ग १ चे १पद, परिचारिका यांची वर्ग ३ ची ४ पदे आज देखील रिक्त आहे, वर्ग ३ व ४ ची एकूण 9 पदे अद्यापही रिक्त आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

 

मात्र रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोकराव थोरात साहेब यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली आहे. शवविच्छेदन कक्षाचे आठ महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबा घेणे बाबत आज पत्र पाठवले आहे.

 

सदर शवविच्छेदन कक्षाच्या कामाची तपासणी करून व तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर ताबा घेण्यात येईल तसेच शव विच्छेदन कक्षात शव विच्छेदन करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री विद्युत दिवे अद्यापही उपलब्ध नसल्याबाबत माहिती डॉ.बाळकृष्ण अहिरे यांनी दिली.

 

त्यामुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधा, अपुरे कर्मचारी याकडे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारतीताई पवार तसेच या मतदार संघाचे आमदार मंत्री ना.छगन भुजबळ यांनी तातडीने लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय दूर करून रुग्णांना शासनाच्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles