♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक उपनगर पोलीसांनी जळगाव येथे जावुन आरोपीता कडुन केल्या १० मोटार सायकल जप्त

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

दिनांक ०४/०७/२०२३ रोजी रात्री ११:०० वा. सुमारास पेंढारकर कॉलनी, महाजन हॉस्पिटल मागे जेलरोड नाशिक रोड नाशिक याठिकाणी फिर्यादी यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा नं. एम. एच. १५ सी. वाय. १५२९ ही राखाडी रंगाची मोटार सायकल लावलेली असतांना आरोपीतांनी सदरची गाडी चोरून नेले बाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे तकार प्राप्त झाली.

सदर बाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शननानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग श्री. आनंदा वाघ यांनी उपनगर पोलीस ठाणे पोलीस पथकास आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या.

तसेच उपनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकास रवाना केले.उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय पगारे व पोनि / बाबा साहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि चौधरी व अंमलदार पोहवा विनोद लखन, पोना सोमनाथ गुंड, पोशि पंकज कर्पे, पोशि गौरव गवळी, पोशि अनिल शिंदे पोशि जयंत शिंदे, पोशि राहुल जगताप, पोशि सुरज गवळी, पोशि सौरभ लोंढे, पोशि संदेश रघतवान असे दोन पथक तयार करण्यात आले.

पोशि जयंत शिंदे व गौरव गवळी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व तांत्रिक विश्लेषणच्या साहयाने सदर आरोपी हे जळगाव जिल्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सपोनि / सचिन चौधरी, पोशि/ सुरज गवळी, पोशि/ जयंत शिंदे हे जळगाव येथे आरोपीतांचा शोध घेणेकामी जळगाव येथे रवाना झाले. सदर आरोपींचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने माहिती घेवून सपोनि /सचिन चौधरी, पोशि/ सुरज गवळी, पोशि/ जयंत शिंदे यांनी

१) अजय शंकर चव्हाण, वय २९, व्यवसाय बिगारी काम, रा. मच्छी बाजार, नवनाथ नगर, सुप्रिम – कॉलनी, एम आय डी सी जळगाव.

२) उत्तम प्रेमा पवार, वय – ३२, व्यवसाय चालक, रा. प्लॉट नंबर १४७, बुध्द विहारच्या जवळ, सुप्रिम कॉलनी, एम आय डी सी जळगाव

याना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे कबुल केले त्यावरून त्याचेकडुन खालीलप्रमाणे चोरीच्या

मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे.
१) १,७०,०००रु.- ०४ अॅक्टीवा मोपेड मोटारसायकल

२) ४,००,००० रु. ०४ होंडा शाईन मोटारसायकल

३) ५०,०००रु. ०१ एचएफ डिलक्स मोटारसायकल

४) ५०,०००रु. ०१ हिरो स्प्लेंडर मोटारसायकल

६,७०,०००/- रूपये किमतीच्या एकुण १० मोटारसायकल
अश्या प्रकारे एकुण ६,७०,००० रु मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सदरच्या मो / साय हया उपनगर पोलीस स्टेशन, पिंपळगाव बसवंत, चोपडा शहर, जळगाव शहर, जामनेर, औरगाबाद ग्रामिण, ब-हाणपुर मध्य प्रेदश येथुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त सो श्री अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शननानुसार मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २, मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग श्री. आनंदा वाघ उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय पगारे व पोनि / गुन्हे बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि चौधरी, श्रेणीपोउनि / गासावी पोहवा विनोद लखन, पोना सोमनाथ गुंड, पोशि पंकज कर्पे, पोशि गौरव गवळी, पोशि अनिल शिंदे पोशि जयंत शिंदे, पोशि राहुल जगताप, पोशि सुरज गवळी, पोशि सौरभ लोंढे, पोशि/ राहुल जाधव, पोशि संदेश रघतवान यांनी तांत्रिक विश्लेषण शाखा, नाशिक शहर यांचे मदतीने पार पाडली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles