♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आरोग्य प्रेमीं तर्फे सामुदायिक वॉकेथॉन लासलगाव येथील सर्व ग्रुप यांचा विशेष सहभाग

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

डॉ. श्रीकांत जिचकार यांनी सुरू केलेल्या मधुमेह मुक्ती व स्थूलता निवारणाचे कार्य डॉ. जगन्नाथ दीक्षित पुढे नेत आहेत. डॉ. जिचकार यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव कॉलेज ग्राऊंड वरून गावात फेरी काढण्यात आली, सुरुवातीस ज्येष्ठ नागरिक संघास भेट देऊन त्यानंतर लासलगाव येथील गोविंद संकुल येथे भेट देऊन पुन्हा कॉलेजचा रस्ता गाठून सामुदायिक वॉकेथॉन करण्यात आले.

लासलगाव व नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी व अनेक भागांतून हे वॉकेथॉन यशस्वी झाले. यामध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्यासाठी पाच किलोमीटर चालावे.

आजचे कार्यक्रमाचे आकर्षण सायकलिंग ग्रुप , शाळेतील लहान मुले,महिलांची मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तसेच लासलगाव चे डॉक्टर असोसिएशन , आणि सर्व स्तरातील व्यापारी, माजी. आमदार कल्याणराव पाटील यांचे 67 वय असतानाही आज त्यांनी या ग्रुपला भेट देऊन एक आदर्श निर्माण केला तसेच लासलगाव स्विमिंग ग्रुप मध्ये त्यांनी जॉइनिंग करून दाखविले की 67 व्या वयात सुद्धा मी अजून जवान आहे .

सर्व लासलगावकरांनी त्यांचा आदर्श घ्यावा .
आजचे विश्वविक्रमी वॉकेथॉन म्हणजे कळसावर फडकणारी विजयपताका होती. डॉ जगन्नाथ दीक्षित सरांमधील उत्साहाला, सकारात्मकतेला, चैतन्याला मानाचा मुजरा. एका ध्येयासाठी भारत आणि देश विदेशातून लाखो लोक एकाच वेळी चालतात हा केवळ डॉ जगन्नाथ दीक्षितांचा करिष्मा आहे. Obesity and diabetes revarsal हा सरांनी लावलेला वेलू आता गगनावरी गेला आहे.

सर्वांचा नाम उल्लेख करणे अशक्य आहे पण हे वॉकेथॉन यशस्वी करण्यात लासलगाव येथील गुड मॉर्निंग ग्रुप, लासलगाव स्विमिंग ग्रुप, स्विमिंग महिला ग्रुप, लासलगाव विंचूर युवा प्रेस क्लब, लासलगाव डॉक्टर असो. लासलगाव प्रेस क्लब, लासलगाव सायकलिंग असो. लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघ पुरुष, आणि लासलगाव जेष्ठ नागरिक संघ महिला, राजमुद्रा मित्र मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर संघटना, लासलगाव ट्रक असो. स्पोर्ट ग्रुप लासलगाव, लासलगाव मर्चंट असो.यांना शतशः नमन. ज्या लोकांनी प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष या वॉकेथॉन मद्धे भाग घेतला त्यांनाही सलाम. हे एक टीमवर्क होते, आणि हे शिवधनुष्य सर्वांनी लिलया पेलले आहे.
लासलगाव येथील वरिष्ठ , अनुभवी वकील उत्तम कदम यांनी नियोजन व सूत्रसंचालन करण्यात आले

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles